Piyush Goyal warning : 'आता एकही अनधिकृत झोपडी दिल्यास, अधिकारी जबाबदार'; केंद्रीय मंत्री गोयल यांची तंबी!

Union Minister Piyush Goyal Navi Mumbai municipal officials illegal slums emerge : नवी मुंबई एकही अनधिकृत झोपडी उभी राहिल्यास महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याची तंबी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली.
Piyush Goyal
Piyush GoyalSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai illegal slums : भाजप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नवी मुंबईत अनधिकृत झोपड्यांवरून महापालिका अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. नवी मुंबईत यापुढे एकही अनधिकृत झोपडी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. तशी न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, त्यांच्यावर कारवाई केली होईल, असा इशारा मंत्री गोयल यांनी दिला आहे.

याशिवाय माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करण्यास सांगितले, तर स्पष्ट नकार द्या. माझे कार्यालय लोककल्याण इथं त्याची तक्रार करा, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

नवी मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील पालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते महात्मा फुले नगरातील 91 पात्र झोपडीधारकांना पुनर्वसन योजनेतील सदनिकांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनधिकृत झोपडपट्टींवरून तंबी दिली.

Piyush Goyal
NCP Mlc Election : राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी 'या' तीन नेत्यांना दिला मोठा आदेश ; उद्या दुपारी होणार नावाची घोषणा

'पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना, उत्तर मुंबईत (Mumbai) एकही नवीन झोपडी उभारली जाता कामा नये आणि कोणी अनधिकृत बांधकाम केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी', असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

Piyush Goyal
Top Ten News : फडणवीसांनी तिघांचा शब्द पाळला, 'मल्हार' नितेश राणेंवर बुमरँग, जयंत पाटील शिवसेनेलाही हवेत - वाचा महत्वाच्या घडामोडी

'प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांचे संगोपन पक्क्या घरात करायचे असते. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावेत. तसेच, बाहेरचा कोणी या भागात येणार नाही आणि येथील रहिवाशांना अन्यायाने बाहेर फेकले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी', असेही मंत्री गोयल यांनी म्हटले.

मंत्री पियुष गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या तंबीवरून राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत. मुबंईतील धारावी झोपडपट्टीच्या विकासाच्या मुद्यावरून सरकार, प्रशासन आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. यातच मंत्री गोयल यांनी नवी मुंबईत एकही अनधिकृत झोपडी उभी राहिल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याची तंबी दिली आहे. या तंबीवर अधिकारी खासगीत काहीसी नाराजी व्यक्त करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com