

MNS news Navi Mumbai : नवी मुंबई शहरात सुलभ शौचालय, पाम बीच मार्ग या ठिकाणी मतदारांची नावनोंदणीचा मोठा घोळ उघडकील आला. यानंतर महापालिका आयुक्तांच्या निवासाच्या नावावर 130 मतदारांची नोंदणी झाल्याचे समोर आलं.
या प्रकारावर गोंधळ उडत असतानाच, आता पुन्हा एक तलाठीच्या मोबाईलवर 288 मतदार नोंदणी झाल्याचे समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. मतदार याद्यांचा हा घोळ समोर येत असल्याने, महाविकास आघाडी मुंबईत उद्या काढत असलेल्या 'सत्याचा मोर्चा'ने निवडणूक आयोगाची कोंडी वाढवली आहे.
निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत दिवसेंदिवस गोंधळ वाढत चालला आहे. नवी मुंबईत शौचालयात , आयुक्त निवासात मतदान नोंदणी झाल्याचा प्रकार समोर आला. यानंतर कोपरखैरणे सेक्टर दोनमध्ये तलाठी यांच्या मोबाईलवर तब्बल 288 मतदार नोंदणीचा प्रकार उघडकीस आला आहे. मनसेचे (MNS) विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
सानपाडा इथं पाम बीच रोडवर 250 मतदार असल्याचे समोर आले होते. आता नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका आयुक्त यांच्या घरात जवळपास 130 मतदार असल्याचे आढळून आले. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील यादी क्रमांक 300मध्ये हे मतदार असल्याचे दिसून येते. निवडणूक आयोगाने हे घोळ तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नवी मुंबई शहरातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 76 हजार दुबार नावे असल्याची तक्रार काँग्रेसतर्फे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी दिली आहे. त्यावर प्रशासनातर्फे काम सुरू असून नावे रद्द केली जात असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मात्र राज्य निवडणूक आयोगाने विधानसभेची 1 जुलै 2025पर्यंत मतदार यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी गृहीत धरली आहे. याच मतदार यादीत घोळ वाढल्याने याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची चिन्हं आहेत. या मतदार यादीत घोळ असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.