
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) कोठडीत असताना त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. मलिक यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून, आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.
मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. त्यांना रुग्णालयातून आज सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मलिक यांची कन्या निलोफर मलिक यांना दिली. रुग्णालयातून सोडताच मलिक यांची रवानगी पुन्हा ईडीच्या कोठडीत होईल. त्यांची न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे. (Nawab Malik News Updates)
नवाब मलिक यांची दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना काही वेळात पुन्हा कोठडीत हलवणे अपेक्षित होते. मात्र, उपचारादरम्यान त्रास आणखी वाढल्याने डॉक्टरांनी त्यांच्या उर्वरित चाचण्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रुग्णालयात त्यांच्या उर्वरित चाचण्या करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापूर्वीच न्यायालयाने मलिक यांना ईडीच्या कोठडीत घरचे जेवण, आणि औषध बाळगण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. याचबाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने कोठडी घेण्यापूर्वी मलिक यांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यानंतर त्यांना कारागृहात नेण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.