Nawab Malik नवाब मलिकांच्या इडी कारवाईवर मुनगंटीवार- मिटकरींमध्ये जुंपली

Nawab Malik| BJP| NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यावर आज सकाळी ईडीने (ED) कारवाई केली आहे.
Amol mitkari- Sudhir mungantiwar
Amol mitkari- Sudhir mungantiwar Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यावर आज सकाळी ईडीने (ED) कारवाई केली आहे. सकाळी ७ वाजता ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे. मात्र मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले असल्याचीही माहिती आहे. मलिक सध्या ईडीच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरु आहे.

नबाव मलिक हे काही मोठे नेते नाहीत. त्यांच्याहून मोठ-मोठे नेते महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे नवाब मलिकांवर झालेली कारवाई इतकी मोठी नाही, हा काही इतका मोठा मुद्दा नाही. ते योग्य असतील तर त्यांची सुटका होईल. आज राज्यासमोर सर्वसामान्यांचे नेते आहेत. कायद्याने कायद्यानुसार काम करायचे असते. याचा राज्याच्या प्रगतीशी, विकासाशी दुरान्वयेही संबंध नाही. ही काहीतरी व्यक्तीगत बाब आहे. व्यक्तीगत तक्रारीच्या आधारावर जर ही कारवाई केली जात असेल तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही.

Amol mitkari- Sudhir mungantiwar
मोठी बातमी; नवाब मलिकांच्या घरी ईडीचा छापा; २ तासांच्या कारवाईनंतर घेतले ताब्यात

जर तपास यंत्रणांनी एखादी माहिती मिळवण्यासाठी, काही जाणून घेण्यासाठी बोलवण्यात आलं असेल तर त्यावर हरकत घेण्यासारख काही नाही. यापुर्वीही अशी माहिती देशातील मोठ्या नेत्यांकडून घेण्यात आली आहे. मोदीजींनाही सीबीआयने नऊ तास चौकशीसाठी बोलवल होतं. त्यामुळे नबाव मलिकांना इडीने बोलवल ही काही मोठी घटना नाही आज राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न, विजदराचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष देणं म्हत्त्वाच आहे. असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

तर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुनगंटीवारांना उत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी बोलावल्यावर जाण हे कर्तव्य आहे. पण राज्यात याच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन राज्यात सुडबुद्धीचे राजकारण सुरु आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. आताही नवाब मलिक इडीच्या कार्यालयात जातील, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील आणि जनतेच्या सेवेत रुजू होतील असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु असल्याचे ही कळत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांबाबत अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता मलिक यांचीही चौकशी सुरु करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com