फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करण्यावरुन राष्ट्रवादीने काँग्रेसला सुनावले!

काँग्रेसच्या वतीने आज (ता.१४) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले.
Devendra Fadnavis house
Devendra Fadnavis housesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेसच्या वतीने आज (ता.१४) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. ही भूमिका योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नसून असा पायंडा पडला नाही पाहीजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काँग्रेसला (congress) टोला लगावला.

Devendra Fadnavis house
नारायण राणेंना होम पिचवरच महाआघाडीचा मोठा धक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना मुंबईमध्ये काँग्रेसने कामगारांना मोफत तिकीटे वाटप केली. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबमध्ये कोरोना पसरला असा आरोप केला होता. त्यावरुन काँग्रेसने राज्यभर भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन केले होते. त्यावरुन नवाब मलिक यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ''नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करत असताना दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर उतरतात. लोकशाहीमध्ये विरोधाचा अधिकार असताना सरकार किंवा न्यायालयाने निश्चित करुन दिलेल्या जागेवरच निदर्शने करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. त्यामुळे कोणत्याही राजयकी पक्षाने इतर पक्षांच्या नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारणे योग्य होणार नाही. प्रत्येक पक्षाने याबाबत विचार करावा, असे मलिक म्हणाले.

Devendra Fadnavis house
भाजपच्या साडेतीन नेत्यांसाठी शिवसेना भवनात आमदार-खासदार झाडून येणार!

अशा आंदोलनामुळे पोलिस यंत्रणेवर ताण येतो आणि त्यातून वेगळी परिस्थिती उद्भवते. यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने बैठक घेऊन याबाबत ठोस निर्णय घेतला पाहीजे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जे काही म्हटले, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केलेला आहे. विशेषत: संसदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. मात्र, नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा पायंडा लोकशाहीसाठी घातक असून यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे लोकशाहीत अशा आंदोलनाला मान्यता देता येणार नाही, असे मत मलिक यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com