Ajit Pawar Interview: कुटुंबात मला एकटे पाडायचा प्रयत्न केला जातोय! अजितदादांनी दिला 'त्या' निवडणुकीचा दाखला

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून आणि चिन्हावर ताबा मिळवल्यानंतर त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक. निवडणुकीला सामोरे जाताना उपस्थित झालेल्या पक्षफुटीपासून बारामतीच्या उमेदवारीपर्यंत आणि पक्षात झालेल्या अन्यायापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुलाखत.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit Pawarsarkarnama

विजय चोरमारे

Q: निवडणूक सुरू झाली तेव्हा असं चित्र होतं की बारामतीची लढत एकतर्फी आहे. पण नंतर चित्र असं दिसतंय की तुम्हाला प्रचंड काम करावे लागतेय. सोसायटी स्तरापर्यंत तुम्हाला बैठका घ्याव्या लागताहेत. म्हणजे निवडणुकीची पूर्वतयारी झाली नव्हती काय?

A: कधीच कुणी कुठल्या निवडणुकीची पूर्वतयारी करत नाही. मी तर कधीच केली नाही. समोरचा उमेदवार तुल्यबळ समजूनच मी प्रत्येक निवडणुकीमध्ये उतरतो. सोसायट्यांतील मतदारांना मान देणे हे प्रचार करणाऱ्यांचे कामच आहे. एका गावात जर आम्ही जाऊन सभा घेतो, तर सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संभाषण केले, तर चूक काय केली? पवारसाहेब, गेली अनेक वर्षे पहिले फॉर्म भरायचे, शेवटच्या सभेला यायचे. आता पवारसाहेब किती फिरताहेत, कुणाकुणालाला फोन करतात, कुणाच्या घरी जातात. हे मात्र, आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे बघायचे वाकून, या प्रकारचे. अरे व्वा. काय न्याय आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Ajit Pawar Interview: पवारसाहेबांनी तुमची सतत फसवणूक केली का? अजितदादा म्हणाले...

Q:भाजपने खंडणी वसूल केल्याप्रमाणे इलेक्ट्रोरल बाँड वसूल केले लोकांकडून. आधी ईडीचे छापे आणि मग त्या कंपन्यांनी भाजपला देणग्या दिल्या. वस्तुनिष्ठ पुरावे आहेत त्याचे.

A: चेकचा व्यवहार आहे. नंबर एकचा व्यवहार आहे. आणि त्या वेळेस, त्या सरकारने घेतलेला निर्णय. फक्त भाजपने चेक घेतले नाहीत. सगळ्यांनी घेतले. तृणमूल, काँग्रेसने घेतले, राष्ट्रवादीने घेतले. कमी - अधिक प्रमाणात घेतले असतील. पण कसे आहे, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विचाराचा असतो. आणि त्या पद्धतीने ते प्रश्न विचारत असतात. हा मला नाही वाटत भ्रष्टाचाराचा आरोप आहे. सुप्रिम कोर्टाने काय करावे, ती वेगळी यंत्रणा आहे. तो त्यांचा अधिकार आहे. पण, चेकचे पैसे घेणे आणि ते इन्कमटॅक्सला दाखवणं याच्यात मला काही चुकीचे वाटत नाही.

Q:लोकसभा निवडणूक तुमच्या पक्षाच्या दृष्टीनं किती महत्त्वाची आहे?

A: माझ्या दृष्टीने ग्रामपंचायतीची निवडणुक तेवढीच महत्त्वाची असते गावाच्या दृष्टीने. आणि लोकसभेची १४० कोटी जनतेच्या दृष्टीने.

Q:आता बारामतीतनं सुनेत्रा वहिनींची जी उमेदवारी आहे, तो निर्णय तुमचा आहे, सुनेत्रा वहिनींचा आहे की भाजपने त्यांच्या उमेदवारीचा आग्रह केला?

A: या तिघांचाही नाही. तो निर्णय आमच्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे.

Q:तुम्ही मध्ये एक विधान केले होते, सुरुवातीला. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात. कुटुंबात मला एकटे पाडायचा प्रयत्न केला जातोय. ही राजकीय लढाई अशी कौटुंबिक पातळीवर येईल, असे तुम्हाला वाटले होते कधी ?

A: हो. कारण, माझ्या आजींनी सांगितले होतं, त्या मला अज्जू म्हणायच्या, अजितच्या ऐवजी अज्जू. अजू तुला माहिती नाही, परंतु तू दोन वर्षाचा होता, त्यावेळेस आपले दादा, म्हणजे वसंतदादा पवार शेकापचे नेते होते. आमचे सगळे कुटूंब गोविंदरावजी पवार, शारदाबाई, वसंतराव, अनंतराव, माधवराव, दिनकरराव, प्रतापराव जेवढी काही भावंडे होती आणि सगळ्या आत्या, सगळेजण आमच्या काकांचे काम करत होती. आणि त्यावेळेस एकमेव पवारसाहेब विद्यार्थीदशेमध्ये काँग्रेसचे काम करीत होते. एकमेव. त्यावेळेस काँग्रेसची सीट आली, आमचे दादा पडले. आमच्या घराण्याला ते वाईट वाटले. दुःख झाले, वेदना झाल्या... सगळं घर एकाबाजूला होते. सगळं घर...

तो इतिहासच आहे....

तो आहे ना.

A: मग आहे ना. आमच्या जन्माच्या वेळेस हे घडलेले आहे. त्यामुळे आत्ता जे घडले, त्यात विशेष आम्हाला काही वाटत नाही आमच्यात तीनच फॅमिली सध्या काम करताहेत. फार नाही. माझे कुटूंब फार मोठे आहे. आपण फोटो बघा दिवाळीचा. अर्थात पवार साहेबांचं कुटूंब माझ्या विरोधात विरोधात काम करतेय. त्यात श्रीनिवास आणि राजेंद्र पवारांचं कुटूंब करतेय. तीनच. बाकीची कुटूंब नावे सांगू का, कोण कोणाची... ते कुणी काम करत नाहीत. कुठल्याही बहिणी काम करत नाहीत. उगीच अमूक अन् तमुक काम करतेय. बाकीचे सगळे म्हणाले, अजित तू आणि साहेबपण आम्हाला सारखेच. असे आमचे कुटूंब आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com