मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राहुल नार्वेकरांचे अभिनंदन केले. नार्वेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित पवार यांनी गेल्या काही दिवसात झालेल्या सत्तात्तरांच्या घडामोडीवर भाष्य करीत भाजप, शिंदे गटाला चिमटे काढले. (Ajit Pawar latest news)
जावई-सासऱ्याचे वर्चस्व
नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले, " नार्वेकर अभ्यासू , कायद्याचे जाण असलेले अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. ते रामराजे निंबाळकर यांचे जावई असल्यानेही आमचेही जावई आहेत, विधीमंडळात जावई-सासऱ्याचे वर्चस्व आहे.पण जावायाला आमचा हट्ट पुरवावा लागेल,"
"नार्वेकरांकडून सर्वांना न्याय मिळेल,अशी अपेक्षा आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विकासाची चाके अधिक गतीमान होतील. आपण अभ्यासू असल्याचे त्यांचा प्रभाव विधीमंडळाच्या कामावर असेल. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांना सव्वा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी उत्तमपणे काम केले. यापूर्वीच्या अध्यक्षांनी सभासदांना न्याय देण्याचे काम केले आहे, हेच काम तुम्ही पार पाडाल, ही अपेक्षा आहे."
जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह
फडणवीस म्हणाले, आज हाही योगायोगही असेल की, वरच्या सभागृहातील सभापती आणि यांचं नातं सासरं आणि जावयाचं आहे. पु. ल. देशपांडे असं म्हणतात की, जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण. जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे, असं पुलं म्हणतात, असं सांगत फडणवीसांनी नार्वेकरांची फिरकी घेतली.
महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरूण आहेतच पण देशाच्या इतिहासातीलही तरूण अध्यक्ष आहेत. या सभागृहाच्या अध्यक्षस्थानाला विशेष महत्व आहे. हे कायदेमंडळ आहे. गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो किंवा कुठल्यातरी कर्नाटकच्या सीमेवरील माणूस असो. प्रत्येेकाचा विचार, आशा-आकांक्षा या सभागृहात प्रतिध्वनित होतात. आणि छोट्यातले छोटे प्रश्न सोडवण्याची क्षमता य सभागृहात आहे. त्यामुळे या सभागृहाचे अध्यक्ष होणं, हा भाग्याचा योग आहे, असं फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.