
Mumbai News : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघं एकाच मंचावर आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर छगन भुजबळ यांना एक संदेश लिहून दिला होता. तो संदेश नेमका काय होता, यावर छगन भुजबळांनी सूचक अशी प्रतिक्रिया दिली.
'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ...', अशी प्रतिक्रिया देत पवार यांच्या 'त्या' संदेशाबाबत आखणी उत्सुकता वाढवली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ हे पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्ताने एकाच मंचावर आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर एक संदेश लिहिला. हा संदेश लिहून त्यांनी तो काही वेळ बाजूलाच ठेवला. काही वेळ जाऊन दिल्यानंतर त्यांच्या शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांनी तो संदेश वाचायला दिला. यावेळी काही सेकंद दोघांमध्ये मंचावर संवाद झाला आणि दोन्ही नेते हसले देखील. मंचावरील दोघांमधील ही सर्व घडामोड कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान, या दोन दिग्गज नेत्यांमध्ये कोणत्या संदेशाची देवाणघेवाण झाली, यावर राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत सूचक असे विधान केले आहे. भुजबळांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी 'तो' संदेश काय होता, यावर विचारल्यावर, त्यांनी सूचक अशी प्रतिक्रिया देत 'त्या' संदेशाविषयी उत्सुकता आणखी वाढवली. 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ...', असे म्हणत पवार यांच्या 'त्या' संदेशाविषयी काही गोष्टी, तशाच राहू द्या, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले. याशिवाय फसणवीससाहेब काय अन् शरद पवारसाहेब काय, दोघेही मला सारखेच आहेत, असेही भुजबळ यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर पुण्यात आले होते. या दोघा नेत्यांनी एकमेकांवर कौतुक केले. समता परिषदेच्या सभेत आम्ही शरद पवार यांच्याकडे मंडल आयोगाची शिफारसीची मागणी केली होती. त्याची अंमलबजावणी पवारसाहेबांनी केली. शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलले, असे म्हणत भुजबळांनी शरद पवार यांचं कौतुक केलं.
छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांना मंत्रीपदावरून डावलल्याने त्यांची ही नाराजी वाढल्याची चर्चा आहे.त्यामुळे छगन भुजबळ हे अजित पवारांची साथ सोडू शकतात का? अशाही चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली, तेव्हा छगन भुजबळ अजित पवारांकडे गेले. शरद पवार अन् छगन भुजबळांमध्ये पुण्यातील कार्यक्रमादरम्यान काही सेकंद झालेली ही चर्चा आणि लिहिलेला तो संदेश या कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.