Ajit Pawar At Silver Oak : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारून, पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या साथीचे तीन डजन आमदारा फोडून भाजपबरोबर हातमिळवणी करून सत्तेत गेलेले, त्यानंतर अप्रत्यक्षपणे शरद पवारांना अनेक बाबींवरून सुनावणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी (दि. १४) रात्री थेट 'सिल्व्हर ओक' गाठून पवारांची भेट घेतली. दोन्ही पवारांमधील संबंध ताणल्याची चर्चा झडत असतानाच अजितदादांच्या सिल्व्हर ओक भेटीने राजकीय वर्तुळ पुन्हा चक्रावून गेले आहे. अजितदादांची ही भेट पूर्वनियोजित आहे की धावती भेट ठरली, अशा प्रश्नांनी सत्ताधारी आणि विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत. (Latest Political News)
बंड केल्यानंतर अजित पवारांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आले. यानंतर सरकार आणि पक्षप्रमुख म्हणून अजित पवार यांनी शरद पवार यांना टार्गेट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे गणित चुकल्याचे दिसून आले. या काळातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि इशारेवजा भाषेमुळे या दोघांत दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रामुळे पुढे काय, अशी चर्चा असतानाच अजित पवार अचानक 'सिल्व्हर ओक'च्या वाटेवर दिसले.
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच क्रँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. प्रतिभा पवार यांच्यावर कुठली शस्त्रक्रिया केली जाणार आहे याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार प्रतिभाकाकींची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहचले आहेत. या भेटीत ते प्रतिभाकाकी पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याची समजते. मात्र तेव्हा सिल्व्हर ओकवर कोण कोण उपस्थित होते, त्यांच्याशी बोलले का, त्याचा तपशील काय, शरद पवार यांच्यासोबत बोलले याची उत्सुकता आता साऱ्यांनाच आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.