Raj Thackeray On NCP Crisis : शरद पवारांच्या भूमिकेबाबत राज ठाकरेंना शंका; म्हणाले, "केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री..."

NCP Split And Raj Thackeray : दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल कुणाच्या सांगण्यावरून गेले ?
Raj Thackeray, Sharad Pawar
Raj Thackeray, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP And Thane : महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरातच रविवारी (दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचनाक घडलेल्या या प्रकारामुळे राज्यातील नेत्यांसह सामान्य नागरिकांनाही धक्का बसला आहे. (Latest Political News)

राज्यात रविवारी अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह इतर काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. ठाकरे सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील राजकारण रसातळाला गेल्याची खंत राज यांनी यावेळी व्यक्त केली. कोण कुणाविरोधात आहे, कोण कुणाबरोबर आहे, हेच समजेना झाले आहे. त्यामुळे मतदारांनी याचा विचार करण्याची वेळ आल्याचेही आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.

Raj Thackeray, Sharad Pawar
Satish Chavan With Pawar News : काल गैरहजर, आज सत्काराला हजर ; चव्हाण, काळे अजित पवारांसोबतच..

राज ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली आहे. बंडाच्या मागे आपला काही हात नसल्याची भूमिका पवार यांनी रविवारीच स्पष्ट केली आहे. याबाबतच ठाकरे बोलले आहेत. राज ठाकरे म्हणाले, "बंडात अजित पवार यांना दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी साथ दिली आहे. हे नेते पवार यांनी सांगितल्याशिवाय असे करतील, असे वाटत नाही."

Raj Thackeray, Sharad Pawar
NCP Crisis : राष्ट्रवादीच्या संघर्ष काळात बाप-बेटे मैदानात ; प्रतीक पाटील कराडमध्ये तर..

आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले असले तरी उद्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होण्याची शक्यताही ठाकरे यांनी व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते आदेशाशिवाय बंडखोर अजित पवारांना साथ देतील असे वाटत नाही. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले तर मला कसलेही आश्चर्य वाटणार नाही. राज्यातील राजकारण दिवसेंदिवस गलीच्छ होत चालले आहे. याबाबत लवकरच राज्यभर सभा घेऊन सविस्तर बोलणार आहे."

Raj Thackeray, Sharad Pawar
Baramati Dudh Sangh: मोठ्या राजकीय उलथापालथीमध्येही अजित पवारांचे बारामतीवर लक्ष; दूध संघाच्या अध्यक्षपदी गावडेंची केली निवड

दरम्यान, रविवारी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, "आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com