Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांनी सांगितली अजित पवार गटाची खोड; म्हणाले, "पांडुरंग म्हणायंच अन्..."

NCP Crisis And Sharad Pawar : "माझ्या फोटोशिवाय अजित पवार गटाचं नाण वाजणार नाही"
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis Live : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करूनही अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते शरद पवार यांना दैवत मानतात. कुणी ते आमच्या ह्रदयात असल्याचे सांगतात. तर कुणी शरद पवार आमच्यासाठी पांडुरंग मानतात. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोपही ते करतात. यावर शरद पवारांनी अजित पवार गटात सहभागी नेत्यांवर सडकून टीका केली. (Latest Political News)

मुंबईतील वाय.बी. सेंटरवर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माझेच फोटो लावतात. मला पाडुरंग म्हणतात. दैवत मानतात. राज्यभरातून लोक पंढरपुरात येतात. हालअपेष्टा सहन करून पांडुरंगाचे दर्शन घेतात. मला पांडुरंग म्हणणारे मात्र देवळाबाहेरुच हात जोडून निघून जात होते. दर्शन घेतानाही तोंड दुसरीकडे करत होते. असे करुन ते आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करतात. एकीकडे पांडुरंग म्हणायचे आणि सोडून जायचे."

Sharad Pawar, Ajit Pawar
Shivsena On NCP Crisis News : राष्ट्रवादीतील बंडानंतर उद्धव ठाकरेही करणार राज्याचा दौरा..

छगन भुजबळ यांनी पवारांना पांडुरंग म्हटले होते. तर जयंत पाटील यांना बडवे म्हणत टीका केली होती. यावर पवारांनी छगन भुजबळ यांचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, "पक्षात फूट पडत असल्याचे छगन भुजबळ यांना समजले. त्यांना मला सांगितले की तिकडे काय चालले आहे ते पाहून येतो. भुजबळ तिकडे गेले आणि त्यांनीच शपथ घेतली. अशा फुटीर वृत्तीवर बोलणे योग्य नाही. फुटीरांबाबत माझी काहीही तक्रार नाही."

Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar On Ajit Pawar : शरद पवारांचा एक घाव दोन तुकडे, थेट शिवसेना अन् भाजपच्या हिंदुत्वातला फरकच सांगितला

वारंवार सांगितले तरी ते माझा फोटो वापरतात, असा टोलाही पवार यांनी अजित पवार यांना लगावला. शरद पवार म्हणाले, "ते मला पांडुरंग म्हणतात आणि माझ्यावर आरोपही करतात. आज त्यांच्या कार्यक्रमात माझा सर्वात मोठा फोटो होता. याबाबत त्यांना सांगितले होते की फोटो लावू नका. मात्र त्यांना माहीत आहे की माझ्या फोटोशिवाय त्यांचे नाणे चालणार नाही. आपले नाणे खणखणीत असले की दुसऱ्याचे फोटो लावायची वेळ येत नाही."

Edited by Sunil Dhumal

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com