Eknath Khadse : विलासराव देशमुख, निलंगेकरांप्रमाणेच शिंदे राजीनामा देतील का ? खडसेंचा सवाल

Eknath Khadse : मला मंत्री पदाचा राजीनामा द्यावयास लावला, या ठिकाणी तर भूखंड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चूक मान्य केली आहे.
Eknath Khadse, Eknath Shinde
Eknath Khadse, Eknath Shindesarkarnama

Eknath Khadse : नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटप प्रकरणात न्यायालयाच्या स्थगितीनंतरही तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हस्तक्षेप केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सध्या होत आहे. राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खडसे पत्रकारांशी बोलत होते. (Eknath Khadse latest news)

नागपूर येथील एनआयटीच्या ८६ कोटीचा भूखंड अवघ्या दोन कोटी रूपयांना देण्यात आला. नगरविकास मंत्री असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला असल्याचे मान्यही केले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

खडसे म्हणाले, " नागपूर येथील भुखंड घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चूक मान्य केली आहे, आणि चुक ती चुकच असते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे,"

"माझ्या तर भूखंड घोटाळ्याशी कोणताही संबध नव्हता, खरेदीसाठी मी पैसेही दिल नव्हते, केवळ एक बैठक घेतल्याचा आरोप होता, परंतु ती बैठकही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली होती. त्यामुळे जो भूंखड घोटाळा झालाच नाही, त्याबद्दल माझ्या चौकश्‍या करण्यात आला, मला मंत्री पदाचा राजीनामा द्यावयास लावला, या ठिकाणी तर भूखंड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारली पाहिजे," असे खडसे म्हणाले.

Eknath Khadse, Eknath Shinde
Jaykumar Gore : अपघात नव्हे घातपात ? ; गोरे यांचे वडिल म्हणाले, 'पुलाचा कठडा तोडून गाडी गेली कशी..

मुलीच्या परिक्षेत गुण वाढल्याच्या आरोपावरून शिवाजीराव निलंगेकराना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, २६-११ च्या घटनास्थळावर एका चित्रपट दिग्दर्शकाला सोबत घेवून गेल्याबद्दल विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या मुख्यमंत्र्यानी नैतिकतेची जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घेवून नैतिकतेने राजीनामा द्यावा असे अवाहनही त्यांनी केले आहे.

Eknath Khadse, Eknath Shinde
Mumbai Police News : पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या टि्वटनं खळबळ ; डीजीपीकडे मदतीची याचना

याबाबत भाजपने कठोर भूमिका घेवून ही कारवाई करावी, आमची मात्र नैतिकतेच्या अधारावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी कायम राहणार आहे.जोपर्यंत राजीनामा देत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे खडसे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com