
natasha and allens wedding
sarkarnama
मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची एकुलती एक कन्या नताशा हीच्या लग्नसोहळ्याच्या पार्टीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. ७ डिसेंबर रोजी साध्या पद्धतीनं नताशा आणि तिच्या बालमित्र एलन यांचा नोंदणीपद्धतीनं विवाह झाला होता. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं होतं.
नताशा अन् एलन यांचे वेडिंग रिसेप्शन गोव्याच्या एका पंचताराकीत रिसॅाटमध्ये झाले, या सोहळ्याला शिवसेनेच्या नेते उपस्थित होते. रविवारी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने विवाह स्वागत समारंभ झाला. नताशाचा पती एलन पटेल ख्रिश्चन धर्मीय असल्याने पारंपरिक ख्रिश्चन पद्धतीनेही हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. गोव्यातील एका रिसॉर्टवर थाटामाटात ख्रिश्चन पद्धतीने हा विवाह स्वागत समारंभ पार पडला. समुद्रकिनारी ओपन गार्डनमध्ये या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर या विवाह स्वागत समारंभासाठी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला जयपूरला हजेरी लावल्यानंतर हे सर्व गोव्यात आले होते.
कोरोनामुळे आव्हाडांची आपल्या मुलीचे लग्न साधे पद्धतीनं केले अशी चर्चा असताना गोव्याला झालेल्या या वेडिंग रिसेप्शनची चर्चा सोशल मीडियावर रंगली. या सोहळ्याचे व्हिडिओ व्हारयल झाल्याने काही नेटकऱ्यांनी आव्हाडांवर टीका केली. आव्हाडांनी या टीकेला उत्तरे देत स्पष्टीकरणं दिले आहे.
natasha and allens wedding
sarkarnama
ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, '‘काही विकृतांच्या माहितीसाठी अॅलन हा ख्रिश्चन आहे म्हणून त्याला ख्रिश्चन पद्धतीने लग्न करावं लागलं. त्याच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी गोवा हे ठिकाण निवडलं. अॅलन आणि नताशा हे दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत आणि ते एकमेकांच्या आवडी-निवडीचा आदर करतात’,''
पहिलीपासून एलन आणि नताशा एकत्र शिकले आहेत. बालपणीचा मित्रच नताशाचा लाईफ पार्टनर झाला आहे. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. तो स्पेनमधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं होतं. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलीचं लग्न 7 डिसेंबरला त्यांनी अगदी साधेपणानं लावलं. आपल्या घरी रजिस्टर विवाह (Register Marriage) करुन देत त्यांनी मुलीला सासरी पाठवलं. त्यावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.