Jitendra Awhad : 'सुडाचे राजकारण..' ; राष्ट्रवादी-शिंदे गटातील संघर्ष पेटला, आव्हाडांच्या नावाचा फलक...

Jitendra Awhad News : एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरुन काढण्यात आला असल्याचा आरोप आव्हाडांनी टि्वट करीत केला आहे.
Jitendra Awhad  News
Jitendra Awhad News sarkarnama

Jitendra Awhad News : आगामी स्थानिक महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात आता राजकीय घडामोडींना वेग येत आहे. शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पाडण्याचा प्रयत्न शिंदे गट करीत आहे.

आव्हाड यांनी कळव्यात आमदार निधीतून केलेल्या कामांचा उल्लेख असलेला फलक (LED Board) आमदार निधी तून लावण्यात आला होता. आज (सोमवारी) सकाळी अचानक आठ वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली तो बोर्ड हटविण्यात आला आहे.या घटनेवरुन आव्हाड-शिंदे गटात संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा फलक मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरुन काढण्यात आला असल्याचा आरोप आव्हाडांनी टि्वट करीत केला आहे. 'किती हे सुडाचे राजकारण..'असे टि्वट करीत आव्हाडांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

"मी मनिष जोशी यांना फोन केला असता, त्यांचे उत्तर साध्या आणि सोप्या शब्दात होतं काय करणार साहेब, फोन आल्यावर नाही म्हणू शकतो का मी.

Jitendra Awhad  News
Pune : 'सात हजार घ्या, प्रचाराला या..' ; ऑडिओ क्लिप व्हायरल , उमेदवार कोण ?

याचा अर्थ फोन कोणाचा आला असेल ते मला समजत. मी केलेली काम आणि जण जागृती चे संदेश त्या बोर्ड वर होते …," असे आव्हाडांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

सहा महिन्यापूर्वी राज्यात सत्तातर झाल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय चढाओढ अधिक तीव्र होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे. त्याला आता सुरवात झाल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com