मुंबई : शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना बसण्यासाठी खूर्ची दिली. याचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यावरुन भाजप नेत्यांनी त्यावर टीका केली आहे. याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाडांनी याबाबत टि्वट करुन व्हिडिओ शेअर केला आहे.
शरद पवार यांची प्रकृती लक्षात घेता शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खूर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, तो कोण आहे, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही.
''वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते आपण त्यांच्यासाठी करतोच. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? त्याबाबत एवढं बोलायचयं, महाराष्ट्रात काय सुरु आहे? '' असा सवाल आव्हाडांनी भाजप नेत्यांना विचारला आहे.
''मोठा माणूस आला तर आपण उभे राहतो. तो मुख्यमंत्री आहे म्हणून आपण उभे राहतो. कारण त्या पदाचा आदर असतो, शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाबाबत संजय राऊतांना माहित आहे. त्यामुळे तत्काळ त्यांनी निर्णय घेतला. त्यांना मी नमन करतो,'' असे आव्हाड म्हणाले.
संजय राऊत यांचा हा फोटो काहींनी सोशल मीडियाच्या फेसबूकपेजवर पोस्ट करुन, कॅप्शन द्या म्हणून आवाहन केलं होतं. या फोटोवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तर दुसऱ्या बाजूने पाठराखणही झाली. या फोटोला सोशल मीडियावर कुणी काय कॅप्शन दिलं यापेक्षा, या फोटोवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी या फोटोवर कॅप्शन मागणाऱ्या आणि टीका करणाऱ्यांना अतिशय कडक शब्दात आणि वाईट शब्दात उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर भर पत्रकार परिषदेत केला आहे. संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले होते की, मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत. त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असे सांगेन, असे राऊत म्हणाले होते. यानंतर भाजपच्या नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला. राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. भाजपच्या महिला नगरसेवकांनी मुंबई पोलिसांत राऊतांविरोधात तक्रारही दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.