हिजाबवरुन आव्हाडांचा भाजपला टोला ; म्हणाले,''केंद्रात एक मंत्रीच करा''

कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण, त्यापेक्षा केंद्र सरकारमध्ये एक मंत्रीच करा, मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असे खाते सुरु करा, त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील.
 Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

कल्याण : राज्यात महापालिकेच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी हिजाबवरुन (hijab)सुरु असलेल्या वादावर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad)भाजपला (bjp) टोला लगावला. त्यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ''लोकांनी काय घालावं ,काय खावं ,कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण, त्यापेक्षा केंद्र सरकारमध्ये एक मंत्रीच करा, मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असे खाते सुरु करा, त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील,'' केंद्र सरकारच्या धोरणांवर आव्हाडांनी सडकून टीका केली. ''महापालिका निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा,'' असे आवाहन त्यांनी केले.

''केडीएमसी निवडणूकीत शिवसेनेसोबत आघाडी होणार का या प्रश्नावर उत्तर देताना आघाडी धर्म पाळणं हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे ,आम्ही आघाडी धर्म पाळतोय ,आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र त्यांच्या मनात हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही,'' असा चिमटा आव्हाड यानी शिवसेना नेत्यांना काढला.

केडीएमसीतील मला विकास हरवेला दिसतो फक्त विकास म्हात्रेंच्याच घरी दिसतो. अनेक वर्षापासून शिवसेना भाजपची सत्ता होती. विकासाच्या मुद्यावर जेव्हा आव्हाड यांना प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी कल्याण डोंबिवलीत विकास हरवला आहे. तो फक्त विकास म्हात्रे यांच्या घरीच झाला आहे, अशी टीका डोंबिवली मधील भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांचे थेट नाव घेऊन केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्या.

डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांना स्थलांतर बाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी जर लोकांच्या हाताच काम जात असेल तर विरोध करायला हवा अस स्पष्ट केलं त्यामुळे एकीकडे शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे मंत्री यांनी विरोध दर्शवत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.

या कार्यकर्ता मेळाव्यात मोठया प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात गेल्या निवडणुकीत निवडून आलेले व भाजपला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत कुणाल पाटील यांनी येत्या काही दिवसात माझ्यासह आणखी काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

 Jitendra Awhad
'जय श्रीराम' बोलून मुलींचा छळ ; हा द्वेष तुमच्या घरात चालेल का? कॉग्रेसचा सवाल

विकासाच्या मुद्यावर जेव्हा आव्हाड यांना प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी कल्याण डोंबिवलीत विकास हरवला आहे. तो फक्त विकास म्हात्रे यांच्या घरीच झाला आहे, अशी टीका डोंबिवली मधील भाजप नगरसेवक विकास थेट नाव घेऊन केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्या तर याला भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांनी मंत्री आव्हाड यांच्या वक्तव्यावर उत्तर दिले आहे.

म्हात्रे म्हणाले, ''आव्हाड साहेब हे आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि भले पक्ष वेगळा असला तरी पूर्वीपासून आमचे जवळचे संबंध आहेत आणि ते जे बोलले ते कदाचित योग्य देखील असेल माझ्या प्रभागाचा चांगल्या प्रकारचा विकास झाला आहे, म्हणून ते बोलले असतील. कल्याण-डोंबिवली शहराचा विकास झाला का नाही झाला त्यांना याची  कल्पना आहे. मात्र माझ्या दोन वाँर्डचा का विकास झाला त्याच उद्देशाने त्यांनी विधान केलं असेल,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com