एकनाथजी, फक्त माझ्या कानात सांगितलं असतं तर..! अजितदादांनी आदित्य ठाकरेंनाही टाकलं पेचात

अजित पवारांनी भाजपसोबत गेलेल्या महाविकास आघाडीतील आमदारांवरही निशाणा साधला.
CM Eknath Shinde Latest News, Ajit Pawar Latest News
CM Eknath Shinde Latest News, Ajit Pawar Latest News Sarkarnama

मुंबई : मागील तेरा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचे पडसाद रविवारी विधानसभेतही उमटले. नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हा मुद्दा उपस्थित करून चर्चेला तोंड फोडलं. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या खास शैलीत शिंदे यांच्या बंडाचा समाचार घेतला. (Ajit Pawar Latest Marathi News)

आपल्या भाषणात बोलताना अजित पवारांनी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत गेलेल्या आमदारांवरही निशाणा साधला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडावर बोलताना अजितदादा म्हणाले, एकनाथ शिंदे, आपण एकत्र काम केलं आहे. कसं घडलं, काय घडलं, हे मला माहिती नाही. पण तुम्ही फक्त माझ्या कानात सांगितलं असतं की, अजित जरा उद्धवजींना सांग आता अडीच वर्षे झालीत. तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, असं चिमचा अजितदादांनी काढला.

CM Eknath Shinde Latest News, Ajit Pawar Latest News
जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण! फडणवीसांनी घेतली नार्वेकरांनी फिरकी

एवढ्यावर न थांबता अजितदादांनी आदित्य ठाकरेंकडे बघत 'आदित्य काय प्रॉब्लेम आला नसता ना', असा प्रश्न विचारला. 'काय प्रॉब्लेमचं आला नसता. काहीच अडचण नव्हती. आदित्य काय प्रॉब्लेम आला नसता ना. बरं जाऊ द्या, या विषयावर उद्या बोलूया. आज जास्त बोलत नाही. आजचा आनंदाचा दिवस आहे, असं म्हणत अजितदादांनी याविषयावर बोलणं थांबवलं.

जावयाने हट्ट पुरवण्याची वेळ

आजपर्यंत आम्ही जावई हट्ट पुरवत आलो आहे. आता जावयाने हट्ट पुरवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत अजित पवारांनीही नार्वेकरांची फिरकी घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि नार्वेकर यांच्यातील नात्याचा उल्लेख करून फिरकी घेतली होती.

CM Eknath Shinde Latest News, Ajit Pawar Latest News
शहाजीबापूंनी विधानभवनात रुबाबात एन्ट्री केली अन् तो नारा घुमला!

अजितदादांकडून भाजप आमदारांना चिमटा

आम्हाला वेगळी अपेक्षा होती. आज कुणी काही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधुक आहे. आज भाजपच्या आमदारांनी सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून विचारावे की, जे घडलं आहे ते योग्य घडलंय का. दादा तुम्ही बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रिपदचं येईल का नाही, सांगता येत नाही. आता शिवसेनेतून गेलेल्यांपैकी किती जणांना मंत्रिपदं मिळेल, हे सांगता येत नाही. पहिल्या रांगेत तर आमच्याकडचीच मंडळी आहेत, असं पवार म्हणाले. बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर यांचा नावांचा उल्लेख अजित पवारांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com