मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त करत कारवाई केली. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुखमैदान तोफ संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली, अशी बातमी वाचली. हे काय चाललंय राज्यात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. सन २०१९ मध्ये सरकार बनवता न आल्याने भाजप सुडाचं राजकारण करुन महाविकास आघाडीचे बलशाली नेत्यांना टप्प्याटप्प्याने टार्गेट करत असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
ईडीने खासदार संजय राऊत यांच्या राहत्या घरासह त्यांची इतर मालमत्ताही ईडीने जप्त केली. ते सातत्याने भाजप नेत्यांच्या, तपास यंत्रणांच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत होते म्हणून त्यांच्यावर भाजपने सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे महेश तपासे यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी ईडी आणि कोण मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात संजय राऊतांनी तक्रार दिली. त्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करुन तपासाचे आदेश देताच आज त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपने ही कारवाई सुडबुद्धीने केली आहे.
महाविकास आघाडी सरकाच्या नेत्यांच्या विरोधात सुडाचं राजकारण करायचं, त्यांना बदनाम करायचं काम विरोधकांकडून सुरु आहे. ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीकोनातून योग्य नाही, केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग आपल्या विरोधकांच्या तोंड बंद करण्याचे काम या माध्यमातून करत आहे. असे मतही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.