Jitendra Awhad , Raj Thackeray
Jitendra Awhad , Raj ThackeraySarkarnama

किती वेळा जय भीम म्हणाला, घराजवळील चैत्यभूमीला कधी गेला?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
Published on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मशिदीवरील भोंग्यांवर ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा आव्हाड यांनी पुन्हा समाचार घेतला. तसेच जातीयवादाच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं असून आयुष्यात किती वेळा जय भीम म्हणालात, घराजवळ असलेल्या चैत्यभूमीला किती वेळा भेट दिली, 6 डिसेंम्बर ला आपण कुठे असता, अशा प्रश्नांची सरबत्ती केली.

मनसेच्या (MNS) मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर राज्याच्या राजकारणात (Politics) आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आधी विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे असं म्हणायचे आणि मशिदीसमोर भोंगे लावून लोकांना कामाला लावायचं. पण ते असा रोजगार देतील हे माहीत नव्हतं. उद्या काही झालं आणि ते जेलमध्ये गेले, की त्यांना कोण जाणार सोडवायला, हीच का ब्ल्यू प्रिंट, असा सवाल आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad , Raj Thackeray
मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींचं मोठं पाऊल; सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा 'प्लॅन'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीच्या मिरवणुका कधीच छोट्या निघत नाहीत. संविधानाला मानणारा माणूस तो दिवस सण म्हणून साजरा करतो. तुम्हाला हे आज कळलं. आयुष्यात किती वेळा जय भीम म्हणालात, घराजवळ असलेल्या चैत्यभूमीला किती वेळा भेट दिली, 6 डिसेंम्बर ला आपण कुठे असता, अशा प्रश्नांची सरबत्ती आव्हाड यांनी केली.

मीही मागासवर्गीय आहे. या 35 वर्षात मी कधीच शरद पवार यांना जातीपातीच राजकारण करताना पाहिलं नाही. माझी आई-बाप राजकारणात नाही, माझी बँक नाही, कारखाना नाही तरी मी आज या राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे. छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे आम्ही सगळे मागासवर्गीय आहोत. पण पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांना हेडलाईन मिळत नाही, असं टीका आव्हाड यांनी केली. महाराष्ट्र पेटेल, असं वक्तव्य करू नका ही हात जोडून विनंती, असं आवाहन आव्हाड यांनी केलं.

Jitendra Awhad , Raj Thackeray
पाकिस्तानमध्ये भूकंप घडवून आणणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं आहे भारत कनेक्शन!

राज्यात कुठेच क्लेश, द्वेष दिसत नाही. लोकांच्या खिशात पैसे नाहीत. महागाई वाढली आहे. पण त्याबद्दल कोणी बोलत नाही. यावर बोला. मशिदीवरील भोंग्यांवर बोलून काही होणार नाही. ही ४-१० दिवसांची नाटकं आहेत. श्रीराम जरूर बोला पण लोकांना ‘राम नाम सत्य है’ हे बोलायला लावू नका, असंही आव्हाड म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com