पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा...जय भीम! जितेंद्र आव्हाड आक्रमक

जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसींविषयीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
Jitendra Awhad

Jitendra Awhad

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : 'मंडल आयोगाचं आरक्षण आले तेव्हाच ओबीसींसाठी (OBC) नी लढायला हवं होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीस लढले नाहीत,' असं वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वाद ओढवून घेतला आहे. भाजपसह (BJP) ओबीसी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यातच आव्हाड यांनी एक ट्विट केल्यानं यावरून आता आणखी वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

आव्हाड यांनी मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हे ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी उद्या (ता. 5) माझ्या घरावर मोर्चा येणार असल्याचे म्हटले आहे. या मोर्चासाठी पुण्यातून बस मागवण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Jitendra Awhad</p></div>
ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका नाहीतर...! WHO चा गंभीर इशारा

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा...जय भीम!, असं म्हणत आव्हाडांनी ट्विटचा शेवट केला आहे. त्यामुळे यावरून आता वाद पेटण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या ओबीसींबद्दलच्या वक्तव्यावरूनच हा मोर्चा काढला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर आव्हाड यांनीही आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते आव्हाड?

मंडल आयोगाचं आरक्षण आले तेव्हाच ओबीसींसाठी (OBC) नी लढायला हवं होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढले नाहीत, तेव्हा लढले ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचं नसतं. ओबीसींवर ब्राह्मणी पगडा आहे. पण चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही यायला बंदी होती, हेच ते विसरले आहेत, त्यामुळे आता माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले आहे.

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित "सन्मान सावित्रीच्या लेकींचा" एका कार्यक्रमात ते बोलत होते. ''आरक्षणाच्या निमित्ताने आता ओबीसी पुढे येत आहेत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्स अॅप करुन चालणार नाही, तर रस्त्यावरही उतरावं लागले. सरकारशी संघर्ष करावा लागेल. आज 50 टक्के ओबीसी समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हेही ओबीसींनी लक्षात घ्यायला हवं, असं आव्हाड म्हणाले होते.

पडळकरांचा साधला निशाणा

भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल इतका राग का, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल होतं का? ओबीसी समाजाचा अपमान करणारे जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का? असे अनेक सवाल पडळकरांनी उपस्थित केले. जितेंद्र आव्हाड हे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका पडळकरांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com