Nawab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी कमी होईना ; आणखी एक गुन्हा दाखल..

Nawab Malik : समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली होती.
sameer wankhede,nawab malik
sameer wankhede,nawab maliksarkarnama
Published on
Updated on

Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्या अडचणी आणखी वाढतच आहेत. वाशिम न्यायालयाने नवाब मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये(Atrocities Act) गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. (nawab malik latest news)

ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) अटक केली होती. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे एनसीबीची कारवाई वादाचा विषय बनली. या वादाच्या केंद्रस्थानी NCB मुंबईचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) होते. मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते.

sameer wankhede,nawab malik
Vinayak Mete : मेटे अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सीआयडीची मोठी कारवाई

समीर वानखेडे यांच्यावर जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल वाशिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची सुनावणी मंगळवारी झाली. या प्रकरणी समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी कोर्टानं मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसापूर्वी नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे. मलिकांची संपत्ती ( Nawab Malik properties)जप्त करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील तीन फ्लॅट्स आणि धाराशिवमधील 147 एकर जमिनीचाही यात समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकच्या मालमत्तेच्या संलग्नतेची पुष्टी झाल्यानंतर ईडीने हा आदेश दिला आहे.

कथीत मनी लाँड्रिंग प्रकरणात(Money laundering) नवाब मलिक सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. जेलमधून बाहेर पडण्यासाठी मलिक यांची धडपड सुरु आहे. अशातच नवाब मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये(Atrocities Act) गुन्हा दाखल होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com