Thane Political News : एकेकाळच्या सहकाऱ्याचा आव्हाडांच्या निष्ठेवर सवाल; 'फुले-शाहू-आंबेडकरांप्रतीचा बनावट मुखवटा फाटला...'

Jitendra Awhad News : सद्या हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होते आहे.
Thane Political News :
Thane Political News :Sarkarnama
Published on
Updated on

Thane News : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या मुंबईतील भारत जोडो - न्याय यात्रेच्या वेळेचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या व्हिडिओची चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या यात्रेवेळी जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांवर संतापलेले दिसले. या संतापात त्यांनी गळ्यात घातलेला निळं उपरणं काढून कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी त्याचा मारा केला. आव्हाडांचे हे कृत्य अपमानजनक असल्याचे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

आव्हाडांच्या या कृत्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ठाणे शहरातील मुंब्राच्या पोलीस स्टेशनमध्ये आव्हांडाविरोधात लेखी स्वरुपात तक्रार दाखल करण्यात आले. सद्या हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होते आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील पदाधिकारी आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हांडावर हल्लाबोल केला आहे.

Thane Political News :
Ambadas Danve On BJP News : तेव्हा शिवसेनाप्रमुख नव्हते, हे तुम्ही भाग्य समजा; बावनकुळेंच्या ट्विटनंतर दानवेंनी सुनावले..

परांजपे म्हणाले, "काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा वाय जंक्शन येथून मुंब्रा कळवा येथे आली त्यावेळी जितेंद्र आव्हाड राहुल गांधी सोबत होते. राहुल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम देण्यात आली आणि निळं उपरणं देण्यात आलं. त्यांनी ते परिधान केलं. निळं उपरणं आव्हाड यांना देखील देण्यात आले पण ते चिडले आणि त्यांनी ते उपरणं भिरकावून दिले. कार्यकर्त्याला शिवीगाळ केली. या कृतीमुळे आव्हाड यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. कार्यकर्त्यांच्या विषयी आस्था त्यांची दिसली," अशा शब्दात परांजपे यांनी आव्हांडावर हल्ला चढवला.

Thane Political News :
Pune NCP Ajit Pawar : लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल

परांजपे म्हणाले, "आव्हाड (Jitendra Awhad) यांचा काल पारा चढला. त्यांना गर्दी दाखवायची होती. ती काही जमली नाही. आव्हाडांची शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विषयी असणारीआस्था ही खोटी असल्याचे आता समोर आले आहे. आव्हाड यांच्या मतदारसंघातील लोक देखील त्यांना गंभीरपणे घेत नाहीत. कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची गर्दी जास्त होती, म्हणून ते चिडले असतील. गर्दी न जमणे आणि राहुल गांधी यांच्या समोर 'फ्लॉप शो' झाला म्हणून त्यांचा पारा चढला," असे परांजपे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com