
सातारा : चारच दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील युवा नेते शशीकांत वाईकर यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्षपद दिले आहे. श्री. पवार यांनी स्वतः याबाबतची घोषणा मुंबईत केली. NCP made the activist who left the support of MLA Shivendraraje the president of the constituency
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शशिकांत वाईकर यांनी प्रथमच अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व माहिती दिली. या वेळी अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. सातारा - जावळी विधानसभा मतदारसंघात गावोगावी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. दरम्यान, शशिकांत वाईकर यांनी चारच दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम परळी येथे मोठ्या दिमाखात झाला होता. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, तसेच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.