NCP News : निवडणुकीत अजितदादांचा PR सांभाळणाऱ्या कंपनीवर राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक आरोप, "पक्षातील एक फळीच…"

Amol Mitkari On Naresh Arora : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 41 आमदार विजयी झाले आहेत. मात्र, अजित पवारांना मिळालेल्या या यशावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Ajit Pawar, Naresh Arora
Ajit Pawar, Naresh AroraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 41 आमदार विजयी झाले आहेत. मात्र, अजित पवारांना मिळालेल्या या यशावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवाय यावरून आता अजितदादांचा जनसंपर्क सांभाळणारे नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीचे आमदार यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पीआरची जबाबदारी नरेश अरोरा यांच्या 'डिझाईन बॉक्स' या कंपनीने सांभाळली होती.

निकालानंतर अजित पवारांना (Ajit Pawar) मिळालेलं यश हे आपलंच असल्याचा दावा नरेश अरोरा यांनी केला आहे. शिवाय निकालानंतर अरोरा यांनी चक्क अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अरोरा यांच्या या कृतीवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी अरोरा यांच्या योगदानावर शंका उपस्थित केली होती.

या संदर्भात त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केली होती. मात्र, पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी ती पोस्ट सोशल मीडियावरून डिलिट केली. यानंतर मिटकरी (Amol Mitkari) यांची ती वैयक्तिक भूमिका होती, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'एक्स' वरील अकाऊंटवरून करण्यात आली होती. मात्र, यानंतरही अमोल मिटकरींनी नरेश अरोरा (Naresh Arora) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ajit Pawar, Naresh Arora
Top 10 News : 'या' तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा? ; CM शिंदेंनी दिला राजीनामा - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

अरोरा यांनी निवडणुकी दरम्यान त्यांना अडचणीची असणारी पक्षातील एक फळीच संपवल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या यशावर अरोरा यांनी केलेला दावा हा पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी केलेल्या मेहनतीचा अपमान असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. शिवाय अरोरा यांनी पैसे घेऊन त्यांचं काम केलं आहे. ते पगारी शिपाई आहेत, अशी बोचरी टीका देखील मिटकरींनी केली आहे.

तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान करणाऱ्या अरोरा यांच्या भूमिकेला कोणत्याही परिस्थितीत विरोध राहणार असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षाने आपल्याला समज दिली तरीही आपण अरोरा यांच्या भूमिकेचा विरोध करणार असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अरोरा आणि मिटकरी यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Naresh Arora
Mahayuti Govt : महायुती सरकारमध्ये 'या' आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार? संभाव्य यादी आली समोर

नेमकं प्रकरण काय?

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मिळालेल्या भरघोस यशामागे नरेश अरोरा यांच्या पीआर कंपनीचा मोठा हात असल्याची चर्चा सुरू आहे. शिवाय यानंतर अरोरा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्षेप घेतला.

शिवाय अरोरा यांचं हे सगळं यश असल्याचं खोटं असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "डिझाईन बॉक्स नावाची एजन्सी फुकट काम करत नव्हती. अशा प्रकारच्या 3 एजन्सी एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) काम करत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला 57 जागा मिळाल्या.

तेव्हा कोणत्या कंपनीची शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची हिंमत झाली का? तो (अरोरा) दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता देशात इतर ठिकाणी निवडणुका आहेत. आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सी स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न करत विजयाचं श्रेय आपल्याकडे घेत आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com