NCP : रोहित पवारांनी 'तो' व्हिडिओ शेअर करीत भाजपवर केला हल्लाबोल

Rohit Pawar : उत्तरप्रदेशचं वर्णन खुद्द भाजप खासदार पैलवान बृजभूषणसिंह यांच्याच तोंडून ऐका..
 Rohit Pawar
Rohit Pawarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : महापुरामुळे उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यावरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरुन मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. विरोधकासोबतच भाजपच्या नेत्यांनीही भाजपला घरचा आहेर दिला आहे. (brijbhushan singh video)

उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी खासदार बृजभूषण सिंह यांचा हा व्हिडिओ टि्वट करीत भाजपवर टीका केली आहे.

रोहित पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, 'हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं. UP तही अशीच स्थिती असून त्याचं वर्णन खुद्द भाजप खासदार पैलवान बृजभूषणसिंह यांच्याच तोंडून ऐका'

 Rohit Pawar
'मशाल' नंतर आता 'ढाल-तलवार' ला विरोध ; सचखंड गुरुद्वाराचे निवडणूक आयोगाला पत्र

"मी माझ्या जीवनात महापुराच्या दरम्यान असा ढिसाळ कारभार पाहिला नाही," असे म्हणत अप्रत्यक्षपणे बृजभूषण सिंह यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. "आम्ही रडू शकत नाही, भावना व्यक्त करु शकत नाही, राज्यातील जनता रामभरोसे आहे.महापुराच्या परिस्थितीची माहिती असूनही लोकप्रतिनिधी बोलू शकत नाही, त्यांना फक्त ऐकावे लागते," असे बृजभूषण सिंह यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com