विधान भवनाच्या पायऱ्यांवर शीर्षासनाचं धाडस करणारे आमदार दौंड एवढे फिट कसे?

खाली डोकं वर पाय, असं आपण सहज बोलून जातो. पण प्रत्यक्षात असं म्हणजे व्यायामाच्या भाषेत बोलायचं झालं तर शीर्षासन करणं एवढं सोपं नाही.
NCP MLA Sanjay Daund
NCP MLA Sanjay DaundSarkarnama

बीड : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Assembly Session) पहिला दिवस राज्यपालांच्या काही सेकंदाच्या भाषणापेक्षा विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदार संजय दौंड (Sanjay Daund) यांनी केलेल्या शीर्षासनाने अधिक चर्चेत राहिला. खाली डोकं वर पाय, असं आपण सहज बोलून जातो. पण प्रत्यक्षात असं म्हणजे व्यायामाच्या भाषेत बोलायचं झालं तर शीर्षासन करणं एवढं सोपं नाही. त्यासाठी नियमित व्यायाम व सराव गरजेचा असतो. त्यामुळं हा योग करण्याचं धाडस ऊठसूठ कुणी करू शकत नाही.

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार दौंड यांनी मात्र राज्यभरातील आमदारांसमोर तेही विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे धाडस केलं. अनेकांना दौंड यांच्या या फिटनेसचं कौतुक वाटलं. ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या संजय दौंड यांच्या या फिटनेसचा फंडा जाणून घेतला. तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा नियमित व्यायाम असतो. सतत कार्यकर्त्यांचा गराडा, राजकीय कार्यक्रम तसेच दौऱ्यांमधूनही आमदार दौंड हे व्यायामासाठी वेळ काढतातच. हेच त्यांच्या फिटनेसचं रहस्य.

NCP MLA Sanjay Daund
राष्ट्रवादीचे झिरवळ भाजपच्या गळाला ; मलिकांच्या राजीनाम्यासाठी सही..

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे शब्द वापरले आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षांनी विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरुद्ध आंदोलन केले. आंदोलनात सहभागी आमदार ‘राज्यपालांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणा देत होते. याच वेळी आमदार संजय दौंड यांनी पायऱ्यांवरच शीर्षासन केल्याने ते चर्चेत आले.

शीर्षासन दिसते जेवढे सोपे तेवढे करण्यासाठी कठीण आहे. यासाठी नियमित व्यायाम, पिळदार शरीर, शरीरावर नियंत्रण असावे लागते. संजय दौंड यांनी नियमित व्यायामातून हे सर्व कमावले आहे. संजय दौंड हे नियमित व्यायाम करतात, शीर्षासनासह पद्मासन, वज्रासन, सिद्धासन, मत्स्यासन, वक्रासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, गोमुखासन, पश्चिमोत्तनासन करतात. तसेच दोनशे दंड बैठका आणि डंबेल्सही ते मारतात. म्हणूनच त्यांची शरिरयष्टी एवढी काटक आहे. नियमित व्यायामबरोबरच संजय दौंड यांना शेतीचाही तेवढाच छंद आहे.

NCP MLA Sanjay Daund
शिवसेना आमदाराला महाविकास आघाडीत करमेना ; युतीसाठी गडकरींनी गळ

अंबाजोगाई शहरात वास्तव्यास असलेले संजय दौंड नियमित शेतातही जातात. विशेष म्हणजे त्यांनी शेतातही विविध प्रयोग केले आहेत. माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे ते चिरंजीव आहे. पंडितराव दौंड यांनी १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या रेणापूर मतदार संघातून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला होता. पुढे संजय दौंड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वडिलांचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला. त्यांच्या पत्नी आशा दौंडही जिल्हा परिषद सदस्य असून त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाही होत्या. संजय दौंड यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करुनच धनंजय मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत पाऊल ठेवले होते. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी परळीत मदतीच्या बदल्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या संजय दौंड यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर संधी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com