Maharashtra Politics : फसवणूक करुन राष्ट्रवादीच्या आमदारांची स्वाक्षरी घेतली ? ; माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप

NCP News : जनतेला गद्दारी अजिबात आवडत नाही.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan ON Ajit Pawar : रविवारी दुपारी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. चव्हाण माध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांच्या फुटीवर चव्हाण यांनी भुमिका स्पष्ट केली. "स्वाक्षरी करण्यासाठी आमदारांना फसवले गेले," असे चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "जनतेला गद्दारी अजिबात आवडत नाही. जे भाजपसोबत गेले आहेत. त्यांनी राजीनामे देवून निवडणुकीला सामोरे जावे. त्यांना योग्य जागा कळेल," "मोदी व भाजप विरोधात महाविकास आघाडी कायम राहणार आहे. जे सोबत आहेत. त्यांना सोबत ताकदीने आम्ही भाजप विरोधात लढा देणार आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Prithviraj Chavan
Maharashtra Politics : अजितदादांना सत्तेत सहभागी करण्यासाठी भाजपसाठी 'हे' ठरलं मोठं कारण..

शिवसेना फुटली त्यातील पक्षांतर बंदीचा निकाल आँगस्ट मध्ये आहे. त्यात निकाल सुर्य प्रकाशा इतका स्वच्छ आहे. सरकार कोसळू नये यासाठीची भाजपकडून हा प्रयत्न सुरु आहे. चव्हाण म्हणाले, "राष्ट्रवादीचा मोठा वर्ग एनडीएमध्ये सामील झाला आहे. 37 पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत गेले तर ते पक्षांतरविरोधी कायद्यातून सुटू शकतात."

Prithviraj Chavan
Sharad Pawar : अजितदादांचा 'तो' दावा शरद पवारांनी खोडून काढला..; घड्याळ चिन्हाला..

अजित पवार यांना या बंडात पाठिंबा असणाऱ्या पक्षाच्या आमदारांची संख्या अजूनही गुलदस्त्यात आहे. काल (रविवारी) सकाळी ‘देवगिरी’ या अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ३५ आमदार उपस्थित होते, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

"अनेक आमदारांच्या सह्या त्यांना माहिती न देता घेतल्या गेल्या आहेत. शपथविधीनंतर अनेक आमदारांचे मला फोन आले. आमच्या सह्या घेतल्या आहेत, पण आपण शरद पवार यांच्यासोबत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले," असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com