Supriya Sule On Ajit Pawar: सुप्रियाताई म्हणतात, "अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन,"

Maharashtra Politics : ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय,"
Supriya Sule, ajit pawar
Supriya Sule, ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

'अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, अशी आमची अपेक्षा आहे. अजित पवार हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा राज्यातील जनतेला व्हावा, यासाठीच त्यांनी आमच्या पक्षात यावं,' असे केसरकर यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule, ajit pawar
Sanjay Raut News : जाहिरातकांडावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा बनाव ; मयुर शिंदेबाबत राऊतांचे ..

दीपक केसरकरांनी अजितदादांना दिलेल्या खुल्या ऑफरवर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केसरकरांना टोमणा हाणला आहे. सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून तोफ डागली.

"अजितदादांबद्दल अतिशय आदर आहे. परंतु दादा हे विरोधीपक्षाचे नेते आहेत. जबाबदार नेते आहेत. सामाजिक ऐक्य राखण्यात अजितदादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील, याची मला खात्री आहे. आमची अपेक्षाच अशी आहे की, दादांनीसु्द्धा आमच्या सरकारमध्ये यावं. दादा कार्यक्षम ते मंत्री राहिले आहेत. आमच्यासोबत आले तर आम्हाला आनंदच होईल."असे केसरकर यांनी म्हटलं आहे.

Supriya Sule, ajit pawar
Sanjay Raut Slams Eknath Shinde : 'फेविकॉल का जोड' दोन महिन्यात तुटेल ; बेडकानं हत्तीशी तुलना करू नये ; राऊतांनी..

"अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

"अमिताभ बच्चन हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आगामी काळातील निवडणुका बाबत भाष्य केले. होय, आम्ही लोकसभेची तयारी सुरु केली आहे. प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील काम म्हणजे टीमवर्क असल्याचे सुळे म्हणाल्या.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com