NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला हवा अल्पसंख्याकांचा 'विश्वास'; युवा मेळाव्यानंतर नजर अल्पसंख्याकांवर

Ajit Pawar : बाबा सिद्दिकींवर नव्या जबाबदारीची धुरा देण्याचे संकेत
Sunil Tatkare, Ajit Pawar, Praful Patel
Sunil Tatkare, Ajit Pawar, Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता अल्पसंख्याक समाजाकडे लक्ष वळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय 'अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या'चे रविवारी (18 फेब्रुवारी) आयोजन केले आहे.

नवी मुंबईतील सिडको कन्वेक्शन सेंटरमध्ये (वाशी) हा मेळावा होणार असून, खुद्द अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) उपस्थित राहणार आहेत.

Sunil Tatkare, Ajit Pawar, Praful Patel
Ajit Pawar Baramati Rally : 'पक्ष चोरला नाही, रितसर मिळाला'; अजितदादांचा बारामतीत एल्गार...

राष्ट्रवादी आणि मेळावे

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष काही महिन्यांपासून मेळाव्यांवर भर देत आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महिला मेळावा झाला. त्यानंतर गेल्या आठवड्यात पुण्यातील बालेवाडीमध्ये युवा मिशन मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आता 'अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अल्पसंख्याक विभागाचे नेमके काय प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कशी तत्पर आहे आणि या समाजाची साथ राष्ट्रवादी काँग्रेसला कशी मिळेल, याची खबरदारी घेतली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाबा सिद्दिकी नवा चेहरा?

राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक चेहरा नवाब मलिक (Nawab Malik) यांना अजित पवार (Ajit Pawar) गटात येण्याच्या चर्चेत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे ते अजूनही शरद गवार गटात आहेत असे म्हटले जाते. ते अजित पवार गटात असले तरी अल्पसंख्याक चेहऱ्याचे नेते म्हणून नाहीत.

रविवारी होणाऱ्या मेळाव्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांना अल्पसंख्याक नेता घोषित केले जाऊ शकते. मुंबईत अल्पसंख्याक संख्या जास्त असल्याने आणि बाबा सिद्दिकी यांना मुंबईची माहिती असल्यामुळे त्यांना ते फायद्याचेदेखील ठरू शकते. बाबा सिद्दिकी यांना राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती.

मात्र, प्रफुल्ल पटेल यांना ती संधी देण्यात आली. राष्ट्रवादीत प्रवेश करूनही अजून त्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना अल्पसंख्याक नेता घोषित केले जाऊ शकते.

(Edited by Avinash Chandane)

R

Sunil Tatkare, Ajit Pawar, Praful Patel
Ajit Pawar Speech : ‘मला अन्‌ माझ्या कुटुंबाला आगामी निवडणुकीत सर्वजण मिळून एकटं पाडतील'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com