'मुख्यमंत्री शिंदेंनी तेथून बाहेर पडायला हवे होते!'

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शेवटच्या रांगेत स्थान मिळाल्याने जयंत पाटील (Jayant Patil) यांची भाजपवर टीका
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. निती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या फोटो सेशन वरुन राज्यात मोठे रणकंद झाले आहे. या फोटो सेशनचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

जयंत पाटील म्हणाले, औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज यांना दुसऱ्या ओळीत स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडणे गरजेचे होते, असे पाटील म्हणाले.

Jayant Patil
मोठी बातमी : महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?

पुण्यातील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी जयंत पाटील यांची बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुका, बदललेली प्रभाग रचना, राजकीय विषयवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्याशी चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी सवांद साधला.

Jayant Patil
शिंदेच आमचे नेते! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी बांगर, पाटलांच्या बोर्डवरुन ठाकरे गायब

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर बोलताना पाटील म्हणाले की, 'जर देशात न्याय शिल्लक असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात दिसून येईल. नसेल तर ते ही निकालात कळेल. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना पाटील म्हणाले ''औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजाना दुसऱ्या रांगेत उभ केले तर त्यांनी ती सभा सोडली होती. मुख्यमंत्र्यांनी याची आठवण ठेवावी. मी केवळ उदाहरण सांगितले. मी कुणालाही औरंगजेबाची उपमा दिली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ती सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती, मला नवा वाद उभा करायचा नाही. प्रोटोकॅाल नुसार अल्फाबेट नुसार अरेंजमेंट बैठकीमध्ये व्यवस्था करण्यात आलेली असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com