Like NCP, Rashtriya Samaj Party will be the kingmaker: Mahadev Jankar
Like NCP, Rashtriya Samaj Party will be the kingmaker: Mahadev Jankar

राष्ट्रवादीप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्ष किंगमेकर ठरेल : महादेव जानकर

काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कायदे केले आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा लाभच होणार आहे.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे भविष्यात राष्ट्रीय समाज पक्ष किंगमेकर ठरेल, असा विश्‍वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचेही समर्थन केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सातारा नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात आज झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
 
आमदार जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद देशात वाढण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या राज्यातही पक्षाला प्रतिष्ठा मिळत आहे. आगामी काळात राज्याच्या विधानसभेत रासपचे आमदार निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यात फलटण व माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या दोन्ही तालुक्‍यांत रासपची ताकद मोठी आहे. या दोन्ही मतदारसंघांत रासपचे आमदार निवडून येतील.

त्याचबरोबर राज्यातील अन्य भागातही पक्षाचे आमदार होतील. त्यामुळे ज्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष आत्ता किंगमेकर आहे, तशी भूमिका भविष्यात राष्ट्रीय समाज पक्ष निश्‍चित बजावेल. केंद्र शासनाने केलेल्या कृषी विधेयकांचे आमदार जानकर यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले, केंद्रीय कृषी मंत्री तोमर हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना चांगली माहित आहे.

काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कायदे केले आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा लाभच होणार आहे. पशुसंवर्धन मंत्री असताना गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही महाविकास आघाडीचे सत्तेवर आहे, त्यांची नियत चांगली नाही असा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com