Jitendra Awhad: शरद पवार यांनी आपल्या निकटवर्तीय आमदारावर सोपवली मोठी जबाबदारी

Jitendra Awhad Appointed NCP National Spokesperson:काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आव्हाड पक्षात सक्रिय आहेत. पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
Jitendra Awhad On Ncp News
Jitendra Awhad On Ncp Newssarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने सरचिटणीस राजीव झा यांनी ही घोषणा केली आहे. ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ते सलग चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यापुर्वी ते विधान परिषदेवर होते.

काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आव्हाड पक्षात सक्रिय आहेत. पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पवाराचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते.

ठाण्याच्या राजकारणात सक्रीय असलेले आव्हाड हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ता या गावचे आहेत. दुष्काळी भाग असल्यामुळे त्यांच्या वडीलांनी कुटुंबासह ठाण्यात स्थलांतर केले. तेव्हा ते ताडदेव येथील श्रीपत भवन चाळीत राहत होते. सुरवातीला सतीश आव्हाड हे गिरणी कामगार म्हणून काम करीत होते. स्टील उत्पादक कंपनीतही ते कामाला होते. येथे झालेल्या कामगाराच्या लढ्याचे त्यांनी नेतृत्व केले होते.

  • दोन दशकं काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणारे आव्हाड १९९९ मध्ये शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

  • जितेंद्र आव्हाड यांना शालेय जीवनापासून राजकारणाची आवड होती. शाळेच्या निवडणुकीतही ते विजयी झाले होते.

  • १९९९ ते २००८ पर्यंत राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या आव्हाडांना २००२ आणि २००८ मध्ये दोन वेळ विधानपरिषद आमदार म्हणून निवडण्यात आलं होतं.

  • दुसऱ्यांदा विधानपरिषद आमदार असतांना २००९ च्या विधासभा निवडणुकीत आव्हाड यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.

  • २००९ मध्ये शिवसेनेचे राजन किणे यांना १५ हजार ६८९ मतांनी हरवलं आणि पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

  • २००९ नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सुद्धा त्यांनी विजय मिळवला आणि मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवलाय. मतदारसंघ राखण्यासोबतच निवडून येण्याच्या टक्केवारीत सुद्धा वाढ झालीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com