
Hasan Musrif Arrest Anytime : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांची मनी लाँड्रींगप्रकरणी 'ईडी'च्या कारवाईविरोधात मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत विविध कारणांना मुश्रीफांना तात्पुरता दिलासा मिळालेला होता. आज झालेल्या सुनावणीत मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल आहेत. त्या प्रकरणी 'ईडी' तपास करत आहे. 'ईडी'ने मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते. साखर कारखान्यातील भ्रष्टाचारप्रकरणी मुश्रीफ यांना 'ईडी'ने तीनवेळा चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार मुश्रीफ दीर्घ चौकशीला सामोरे गेले आहेत. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज आज फेटाळण्यात आला आहे.
दरम्यान, ५ एप्रिल रोजी न्यायालयाकडून त्यांना दिलासा दिला होता. त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावरील फैसला आज ११ एप्रिल रोजी होणार होता. आजच्या सुनावणीचा निकाल येईपर्यंत आमदार मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते. तसे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत मुश्रीफांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे मुश्रीफांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
मुश्रीफ यांचे जवळचे व्यावसायिक भागीदार आहेत, त्यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याने मुश्रीफ यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या अडीच महिन्यात 'ईडी'कडून मुश्रीफ यांच्या संपत्तीवर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. त्यांना 'ईडी'ने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. मागील सहा ते सात महिन्यांपासून त्यांच्यावर तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे.
सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार आणखी २५ शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे दाखल केली आहे. त्यापूर्वी मुरगूड पोलीस ठाण्यात आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात याच प्रकारची तक्रार कागलचे विवेक कुलकर्णी व इतर शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.