मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह (dawood ibrahim) इतर टोळीच्या सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ((NIA)याचा तपास सुरू आहे.'डी'गँग च्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएने आता कंबर कसली आहे. (Dawood Ibrahim Latest News)
अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या 'डी' कंपनीच्या साथीदारांची माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत एनआयएने पत्रक प्रसिद्ध केले आहे.
दाऊद इब्राहिमवर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर, त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलवर 20 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. " तस्करी, नार्को दहशतवाद, अंडरवर्ल्ड गुन्हेगारी सिंडिकेट, मनी लाँड्रिंग, मालमत्तेचा अनधिकृत ताबा / संपादन अशा अनेक कृत्यांत डी गँग सहभागी आहे. डी गँगकडून दहशतवाद्यांना निधी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना सक्रिय सहकार्यही केले जाते. लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदासारख्या संघटनांसोबतही डी गँगचे संबंध असल्याचे एनआयएने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
"दाऊद इब्राहिम कासकरला संयुक्त राष्ट्राने 'जागतिक दहशतवादी'म्हणून घोषित केले. दाऊद कास्कर त्याच्या जवळच्या साथीदारांसह डी-कंपनी नावाचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवतो," असे एनआयएने स्पष्ट केलं आहे.
"शस्त्रास्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनाची तस्करी करण्यासाठी दाऊदने भारतात डी कंपनी स्थापन केली आहे. डी कंपनी पाकिस्तानी संस्था आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी बक्षिसे जाहीर करण्यात आले आहेत," असे एनआयएने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी मुंबईत काही महिन्यांपूर्वी एनआयएने काही ठिकाणी छापेमारी केली होती. हे छापे दाऊद इब्राहिमशी संबंधित ठिकाणे, त्याच्या निकटवर्तीयांवर होते. या छापेमारीत तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे लागले होते. त्यानंतर एनआयएने काहींना अटक केली होती. एनआयएने सलीम फ्रूटला अटक केली. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेव्हणा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.