Kalyan dombvali News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आता भिवंडी लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. एकीकडे भाजपचे कपिल पाटील दुसरीकडे राष्ट्रवादीतून सुरेश म्हात्रे आणि अपक्ष म्हणून नीलेश सांबरे अशी तिघांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
नीलेश सांबरे यांनी घेतलेल्या वाशिंद येथील मेळाव्यात जिजाऊ संघटनेकडून भिवंडी लोकसभा अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हा मेळावा कृतज्ञता मेळावा असल्याचे फलक कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि शहापूर येथे लावण्यात आले होते. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बहुल भागात पोहचलेले सांबरे हे भाजपचे कपिल पाटील (Kapil Patil) आणि राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना चांगलीच लढत देतील असे दिसून येत आहे.
नीलेश सांबरे यांची जिजाऊ नावाची संस्था आहे. या संस्थेद्वारे शिक्षण, वैद्यकीय सेवा, रस्ते, पाणी या संदर्भात आदिवासी भागात काम करते. अनेकांचे शिक्षण केल्याने अनेक आदिवासी तरुण नोकरीला देखील लागले आहेत. त्यामुळे ही मंडळी नीलेश सांबरे यांच्या पाठीशी राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नीलेश सांबरे हे एक व्यावसायिक असून त्यांनी ठेकेदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. एकनाथ शिंदे (Eakanath Shinde) यांच्या बरोबर देखील त्यांचे जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
साधारण 80 हजार ते लाखभर मत त्यांची आहेत, असे बोलले जाते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आदिवासी नागरिकांना त्यांनी बरीच मदत केल्याने ही सगळी मते त्यांची बांधलेली मत आहेत.
गेले महिनाभर मी भिवंडी लोकसभेत फिरत आहे. या दरम्यान मी अनेक नागरिकांशी चर्चा केली. यावेळी काम करणारा खासदार नागरिकांना हवा आहे, असे समजले. त्यामुळे आपल्या नावाला सर्वांनीच पाठिंबा दिला असून तुमच्या सर्वांचा पाठिंबा असल्यामुळेच मी अपक्ष निवडणूक लढवणार, अशी जाहीर घोषणा त्यांनी मेळाव्या दरम्यान केली.
(Edited by : Sachin Waghmare)