Bhiwadi Lok Sabha 2024: बाळ्या मामा ही कपिल पाटलांची बी टीम; शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली!

Nilesh Sambre on Suresh Mhatre:जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाहीत, समाजाचे ,गावाचे होत नाहीत. कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी या शहरासाठी तालुक्यासाठी केंद्रीय विद्यालय आणायला हवे होते, रेल्वे समस्या सोडवायला हव्या होत्या, असे सांबरे म्हणाले.
Bhiwadi Lok Sabha 2024
Bhiwadi Lok Sabha 2024Sarjkarnama

Bhiwadi Lok Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (Suresh Mhatre) हे भाजपचे उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांची बी टीम असल्याचा आरोप जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी केला आहे.

काँग्रेस संपवण्याची सुपारी शरद पवार यांनी घेतली आहे, अशी टीका सांबरे यांनी केली आहे. "मी सुरुवातीपासून काँग्रेस विचाराचा काँग्रेस कार्यकर्ता आहे. 2013 पर्यंत जिल्हा जनरल सेक्रेटरी काम करतो, आज मी काँग्रेसचा सदस्य आहे," असे सांगत सांबरे यांनी कपिल पाटील, शरद पवार, बाळ्या मामा यांच्यावर टीका केली.

Bhiwadi Lok Sabha 2024
Mamata Banerjee: पाचव्या टप्याच्या मतदानापूर्वीचं ममता बॅनर्जींची मोठी घोषणा; इंडिया आघाडीचे सरकार आले तर..

कपिल पाटील मंत्री असल्यामुळे फार मोठे आहेत, बाळ्या मामा हे आठ पक्ष बदलून आले आहे, म्हणून ते मोठे आहेत, हा चुकीचा समज आहे. जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाहीत, समाजाचे ,गावाचे होत नाहीत. कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी या शहरासाठी तालुक्यासाठी केंद्रीय विद्यालय आणायला हवे होते, रेल्वे समस्या सोडवायला हव्या होत्या, असे सांबरे म्हणाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. येथील समस्या जितेंद्र आव्हाड सोडविणार नाहीत, ते फक्त मुस्लिम मतांचा वापर करतात, असे सांगत आव्हाडांना फटकारले.

भिवंडी लोकसभेतील ( Bhiwadi Lok Sabha 2024) जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना ग्रामीण पाठोपाठ भिवंडी सारख्या मिश्र वस्तीत प्रचारास सुरवात केली आहे.

शांतीनगर परिसरात अल्पसंख्यांक समाजाकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले गेले. शांतीनगर रहिमतपूर या भागात सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या चौकसभेत समाजवादी पक्ष,पिस पार्टी या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांबरे यांना पाठिंबा जाहीर केला.त्यांच्या सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com