Nitesh Rane News : नितेश राणेंनी पुन्हा पोलिसांना धमकावले; म्हणाले, 'तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत...'

Political News : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका करीत निशाणा साधला. तर दुसरीकडे पुन्हा एकदा पोलिसांना धमकावले आहे.
nitesh Rane
nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका करीत निशाणा साधला. तर दुसरीकडे पुन्हा एकदा पोलिसांना धमकावले आहे.

उल्हासनगरमध्ये शनिवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. याच मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोपदेखील नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. (Nitesh Rane News)

'जोपर्यंत यांच्या घरात लव्ह जिहाद होत नाही, तोपर्यंत यांना झळ बसणार नाही,' अशा शब्दांत यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

दुसरीकडे पोलिसांना पुन्हा एकदा धमकी दिली आहे. त्यासोबतच 'तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत आणि आम्ही काही सरकारमधून जात नाही हे लक्षात ठेवा', असे म्हणत त्यांनी पोलिसांनाही थेट इशारा दिला. त्यासोबतच राणे यांनी 'उनका अली, हमारा बजरंग बली' अशी घोषणा देत भाषण केले. त्यासोबतच यावेळी उल्हासनगरच्या तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले. या सगळ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

nitesh Rane
Ajit Pawar News : अजित पवारांची लाडक्या बहिणीसाठी आणखी एक मोठी खुशखबर; पुढच्या पाच महिन्यांत...

उल्हासनगरच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर बोलताना नितेश राणे यांनी 'उनका अली, हमारा बजरंग बली' अशी घोषणा देत भाषणाची सुरुवात केली. 'उल्हासनगरच्या एकेका घरात 40-40 बांगलादेशी आणि रोहिंगे राहात असून ते कुणाच्या परवानगीने इथे राहत आहेत?' असा सवाल यावेळी उपस्थित केला.

आम्ही काही सरकारमधून जात नाही. तुमचे जे काही आहे, ते आमच्याच हातात आहे. तुम्हाला हे बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत, असे म्हणत त्यांनी पोलिसांनाही इशारा दिला. त्यासोबतच हा मोर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांविरोधात जर गुन्हे दाखल केले, तर पोलीस स्टेशनला येऊन तांडव करेन, असा इशारा राणे यांनी दिला.

nitesh Rane
Latur Assembly Election: दोन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या लातूरकरांच्या मनात चाललंय तरी काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com