Arvind Kejriwal Arrest By ED: केजरीवालांच्या अटकेनंतर राणेंनी ठाकरेंना डिवचलं, 'तो' फोटो ट्विट करत म्हणाले...

Arvind kejriwal Arrest News: आमदार नितेश राणे यांनी आता ट्विटच्या माध्यमातून केजरीवालांनंतर (Arvind Kejriwal) कोणाला अटक होऊ शकते, याबाबतचा सूचक इशारा दिला आहे.
Nitesh Rane, Uddhav Thackeray, Arvind kejriwal
Nitesh Rane, Uddhav Thackeray, Arvind kejriwalSarkarnama
Published on
Updated on

Arvind Kejriwal Arrest News: सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्ली सरकारच्या मद्यधोरण अंमलबजावणी गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

देशासह राजधानी दिल्लीत (Delhi) आम-आदमी पक्षाचे कार्यकर्ते केजरीवालांच्या अटकेनंतर आक्रमक झाले आहेत, तर केंद्र सरकारने सूडाच्या भावनेने ही कारवाई केली असल्याचा आरोप विरोधकांसह आपने केला आहे.

एकीकडे केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत, आपल्या विरोधकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत, तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आता ट्विटच्या माध्यमातून केजरीवालांनंतर (Arvind Kejriwal) कोणाला अटक होऊ शकते, याबाबतचा सूचक इशारा दिला आहे. नितेश राणे यांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, "मफलरवाला आतमध्ये गेला लवकरच गळ्यात पट्टा असलेलादेखील आतमध्ये जाईल" राणेंच्या या पोस्टचा रोख उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) असून, त्यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Nitesh Rane, Uddhav Thackeray, Arvind kejriwal
Arvind kejriwal Arrest By ED : दोन तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक

इंडिया आघाडीला धक्का

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या मद्यधोरण अंमलबजावणी प्रकरणी आत्तापर्यंत तब्बल 9 समन्स पाठवल्यानंतर हायकोर्टाने (High Court) केजरीवालांची अटकेपासून संरक्षण तात्पुरता दिलासा देण्याची मागणी फेटाळून लावली होती.

त्यानंतर गुरुवारी ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि रात्री त्यांना अटक केली. त्यांना आज, शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करून चौकशीसाठी कोठडी मागण्यात येणार असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) धामधुमीत केजरीवालांना झालेली अटक इंडिया आघाडीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Nitesh Rane, Uddhav Thackeray, Arvind kejriwal
Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या कारवर भाजप समर्थकांकडून हल्ला? सरकोली गावात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com