नितीन गडकरींचे भाकीत : ... तर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाचीही संधी मिळेल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष पुढे राज्याचा मुख्यमंत्री होतो, असे सांगितले.
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari Sarkarnama

Nitin Gadakari : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाली आहे. बद्दल भाजप कार्यकर्त्यांतर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष पुढे राज्याचा मुख्यमंत्री होतो, असे सांगत तर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाचीही संधी मिळेल, असे भाकीत केले.

Union Minister Nitin Gadkari
Nitin Gadkari video : "अधिकाऱ्यांनी फक्त येस सर म्हणायचं", नितीन गडकरी

नितीन गडकरी म्हणाले, बावनकुळेवर प्रेम करणारे खूप लोक आहेत. हा कार्यक्रम म्हणजे कार्यकर्त्यांना ताबडतोब व्यक्त केलेला आनंद आहे. आपल्यातला एक कार्यकर्त्या महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, जो प्रदेश अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो, असे सांगतानाच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून हसत म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाही बरं का?, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

ते पुढे म्हणाले की, आजकाल मी जे बोलत नाही ते पण मीडिया माझ्या नावावर खपवून देते. मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजेत पण फडणवीस जर केंद्रात गेले तर बावनकुळे तुमचाही विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Union Minister Nitin Gadkari
नितीन गडकरी नाशिकला बोलले ते तंतोतंत खरे ठरले!

भाजप पिता-पुत्रांची पार्टी नाही

त्यामुळे बावनकुळे यांना येत्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. तसा त्यांच्या कर्तृत्त्वालाही वाव आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पिता-पूत्र, आई-मुलाची पार्टी नाही. रिक्षा चालविणारा सामान्य माणूस आज आपल्या कर्तृत्त्वाने महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला. हेच भाजपचे वैशिष्ट्य असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com