Yeshwant Jadhav)
Yeshwant Jadhav)

यशवंत जाधवांचे पद धोक्यात?: मुंबईकरांचे किशोरी पेडणेकरांकडे लक्ष

गेल्या आवड्यात भाजपने स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्ष यशवंत जाधव (Yeshwant Jadhav) यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडला होता

मुंबई : गेल्या आवड्यात भाजपने स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्ष यशवंत जाधव (Yeshwant Jadhav) यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडला होता.स्थायी समिती अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेच्या आज (१८ जानेवारी) होणाऱ्या महासभेच्या कामकाजात ही चर्चा होण्याची शक्यता आहे. इतिहासातील स्थायी समिती अध्यक्षांविरोधातील हा पहिलाच अविश्वास प्रस्ताव आहे.

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढला असून कायदे, नियमांचे पालन न होता स्थायी समितीचे कामकाज केले जात आरोप भाजपचे (BJP) गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी केला होता. तसेच, स्थायी समितीमध्ये आपल्याच कंत्राटदाराला कंत्राट दिले जातात. स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार देखील वाढला असून याला जबाबदार स्थायी समिती अध्यक्ष असल्याचा आरोप करत भाजपने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकरांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे आजच्या सभेत हा विषय महापौर चर्चेला घेणार की प्रस्ताव फेटाळणार हे पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे.

Yeshwant Jadhav)
हे पहिल्यांदाच घडतय : स्थायीच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव

त्याचबरोबर, कोरोना काळात महापालिका प्रशासनाला खर्चाचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, या खर्चाची माहिती १५ दिवसांत स्थायी समितीपुढे सादर करणे गरजेचे असते. परंतून ती काही महिन्यांनंतर सादर केली जाते. पण ती माहितीही अपुरी असते. आता शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले जात आहेत. मात्र त्या खरेदीबाबतची माहिती पूर्णपणे दिलेली नाही.

तसेच, २०१७ मध्ये झालेल्या खरेदीपेक्षा दुप्पट दराने ही खरेदी होत आहे. त्याचबरोबर कोणतेही कंत्राट ठराविक कंत्राटदारांना वारंवार मिळू नये, त्यासाठी वर्तमानपत्र, संकेत स्थळावर जाहिरात द्यावी, असा नियम आहे. त्याचेही पालन होत नाही. अशा अनेक मुद्द्यांवर प्रशासन भ्रष्टाचार करत असून त्यात सत्ताधारी म्हणून शिवसेनाही सहभागी आहे. त्यामुळे हा अविश्‍वासाचा ठराव मांडण्यात आल्याचे शिंदेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com