राज्यपालांचे म्हणणे काहीही असो विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी होणारच!

काँग्रेसचे ( Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पत्रकारांना आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले.
Nana Patole

Nana Patole

Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. या पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने हलचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी आवाजी मतदानाने निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. याला उत्तर देताना काँग्रेसचे ( Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पत्रकारांना आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले. No matter what the governor says, the election for the post of Assembly Speaker will be held on Tuesday!

नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो घटनाबाह्य नाही. राज्यपालांचे म्हणणे काहीही असो विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी होणारच!, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole

मिलिंद नार्वेकरांना धमक्या येत असतील तर सामान्यांचे काय : नाना पटोले

पटोले पुढे म्हणाले की, नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे. तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल, असे पटोले यांनी सांगितले.

Nana Patole

नाना पटोले महाबळेश्‍वरात; राष्ट्रवादीला देणार धक्का!

राज्यपालांच्या आडून भाजपचा छुपा अजेंडा

राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु राज्यपालांच्या माध्यमातून भाजप जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे. भाजप सरकारने लोकसभेत तीन वर्षांत उपाध्यक्षपदाची निवडणूक घेतलेली नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेला माहीत आहे, असेही पटोले म्हणाले.

Nana Patole

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, मातृभाषा व मातृभूमीचा सन्मान केला पाहिजे...

कालिचरण बाबावर गुन्हा दाखल करा

कालिचरण नावाचा एक बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत तर दुसरीकडे गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. या बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ कडक करावी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जगभरातील अनेक देश आदर्श मानतात व त्यानुसार वाटचालही करतात परंतु आपल्याच देशातील काही लोक जाणीवपूर्णक त्यांच्याबद्दल अपप्रचार करतात, त्यांच्याबदद्ल अर्वाच्च भाषा वापरतात हे निंदनिय असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com