महाराष्ट्राच्या 'आमदार निवास'मध्ये थिरकणार सनी लियोनी...

Sunny Leone |Sanjay Londhe : संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं शांताबाई हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे.
Sunny Leone News, Amdar Niwas news
Sunny Leone News, Amdar Niwas newsSarkarnama

मुंबई : सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीने (sunny leone) बॉलीवूड (Bollywood) मध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड दर्शकाना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनीने मराठीमध्ये (Marathi) दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी सनीने 'बॉईज' या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती. आता लवकरच सनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट (Marathi Film) 'आमदार निवासा'मध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. (Sunny Leone News)

Sunny Leone News, Amdar Niwas news
video : कणकवलीतच लागले निषेध करणारे बॅनर

आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई या रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलीवुडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली असून आधुनिक 'शांताबाई'चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत.

२०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ करोड हुन जास्त व्हीज असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक 'शांताबाई' म्हणून सनी लियोनी दिसणार आहे.

Sunny Leone News, Amdar Niwas news
आता बोगस सोमय्यांचाही राष्ट्रवादीला त्रास; मागवली आरटीआयखाली माहिती...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. 'शांताबाई' या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या 'सनी लिओनी'ची दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही तर, या शांताबाई या गाण्याच्या निमित्ताने गायक संजय लोंढे याना एक मोठी संधी संजीवकुमार राठोड यांनी दिली आहे. सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर 'आमदार निवास' भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com