Raj Thackeray on Supreme Court: न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरे म्हणाले, आधीच्या मुख्यमंत्र्यानी...

Maharashtra Politics| आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच काय होणार?
Raj Thackeray on Supreme Court decision
Raj Thackeray on Supreme Court decisionSarkarnama

Raj Thackeray on Supreme Court : कुठल्याही मुख्यमंत्र्याने जपून राहिलं पाहिजे, आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले. म्हणून आज हे सर्व घडलं. आपण कोणत्या पदावर बसलो आहोत. याची जाणीव पाहिजे.आधीच्या मुख्यमंत्र्यांनी जपून राहायला पाहिजे होतं. अशी प्रतिक्रीया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. मीरा-भाईंदरमध्ये राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (On the verdict of the court, Raj Thackeray said, the previous Chief Minister)

न्यायालयाने सांगितलं की सगळी प्रोसेस चुकली पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधीमंडळातला एका गटाला पक्ष म्हणून मान्यता मिळू शकत नाही. मग आता प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाने ज्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं आहे त्याचं काय होणार ? यात सुप्रीम कोर्ट एक वेगळी यंत्रणा आहे, निवडणूक आयोग वेगळी यंत्रणा आहे. आता निवडणूक आयोग काय करणार, या सर्व गोष्टी संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. असे अनेक प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केले. (Maharashtra Politics)

Raj Thackeray on Supreme Court decision
BJP NEWS : जयंतराव, कर नाही, तर डर कशाला ? ; ED च्या नोटीसवरुन भाजपनं डिवचलं ; भावनिक कार्ड सोडा..

राज ठाकरे आज मीरा भाईंदर दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आज मीरा भाईंदर दौरा करणार आहेत. २०२४ च्या निवडणुकांचा अंदाज घेण्यासाठी आपण हा दौरा करण्यासाठी आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान,  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी (ता. ११) जाहीर झाला. या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल, तसेच विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले. (Supreme Court Hearing news)

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेल्या निकालात शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची प्रतोद (व्हीप) म्हणून झालेली नियुक्ती आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते म्हणून झालेली निवड बेकायदा ठरवली. पक्ष आणि पक्षाचा विधीमंडळ गट या दोन वेगळ्या बाबी असल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com