Sharad Pawar Vs Eknath Shinde : कांद्यावरून शरद पवार-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात कलगीतुरा !

Onion Rate Issue In Maharashtra : दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर देऊन केंद्र आणि राज्य सरकाराने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
Sharad Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar, Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : कांद्याचे भाव गडगडल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने धाव घेतली. केंद्र सरकारने राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यास दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची घोषणा केली. केंद्राच्या या निर्णयाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी विरोध केला. यावरून पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. परिणामी कांद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध राज्य सरकार असा कलगीतुरा रंगला आहे. (Latest Political News)

दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर देऊन केंद्र आणि राज्य सरकाराने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टाकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. विशेषतः शरद पवारांनी केंद्राचा कडक शब्दात समाचार घेतला. पवारांच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही पलटवार केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी केंद्राने मोठ्या मनाने मदत केली आहे. पवार स्वतः दहा वर्षे केंद्रीय कृषी मंत्री होते. त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजतात. मात्र यापूर्वीच्या एकाही सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना अशा प्रकारचा दिलासा दिला नाही. आता त्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावे."

Sharad Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar On Onion Issue : कांद्याला दिलेला भाव अमान्य; शरद पवारांचा केंद्र अन् राज्य सरकारविरोधात शड्डू

शरद पवार कृषी मंत्री असतानाही कांद्याला इतका भाव नव्हता अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच केली. शिंदेंच्या या टीकेला 'साम' वृत्तवाहिनीशी बोलताना पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "आता शेतमलासाठी निर्यात शुल्क ४० टक्के केले आहे. मी कृषी मंत्री असताना निर्यात शुल्क कधीही ४० टक्के लावले नव्हते", याकडे शिंदेंचे लक्ष वेधत पवारांनी "सरकारने आता लावलेले निर्यात शुल्क कमी करावे", अशी मागणीही केली.

Sharad Pawar, Eknath Shinde
Rohit Pawar On Onion Issue : जखम डोक्याला अन् मलम पायाला ! कांदा निर्णयावरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा

शरद पवारांनी केंद्रावर केलेली टीका

कांद्याला घोषित केलेल्या दरावर शरद पवार म्हणाले, "केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या अपक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्राने जाहीर केलेला दरातून शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे सरकारने प्रतिक्विंटलला चार हजार भाव द्यावा. आताचा कांदा हा टिकणारा असून दराबाबत योग्य निर्णय घेईपर्यंत शेतकरी थांबायला तयार आहेत. यासाठी सरकारने तत्काळ निर्यात शुल्क कमी करावे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com