AAP चे ४० आमदार 'गायब' ; केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी, ऑपरेशन लोटस?

AAP : 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत 'आप'ला 62 आणि भाजपला 8 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी 36 आमदारांची गरज आहे.
Narendra Modi, Arvind Kejriwal
Narendra Modi, Arvind Kejriwalsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाल्यानंतर आता दिल्लीतही ऑपरेशन लोटसची चर्चा आहे. या चर्चेला पुर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला सुमारे ४० आमदारांनी दांडी मारली. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे आपच्या गोटात धास्ती वाढली आहे.

आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे, मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. आज सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार होती. पण या बैठकीसाठी अनेक आमदारांशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर येत आहे.

70 जागांच्या दिल्ली विधानसभेत 'आप'ला 62 आणि भाजपला 8 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी 36 आमदारांची गरज आहे. भाजप आपचे आमदार फोडण्याच्या प्रयत्नात असल्याच्या आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे.

"भाजपने आमच्या आमदारांना ऑफर दिली. 'आप' सोडल्यास 20 कोटी आणि इतरांना सोबत आणले तर 25 कोटी देऊ, अशी ऑफर होती,"असे आपचे आमदार दिलीप पांडे यांनी काल माध्यमांना सांगितले होते.

Narendra Modi, Arvind Kejriwal
MNS : वसंत मोरे अँक्टिव्ह ; शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच कार्यालयात हजर

आपचे नेते संजय सिंह म्हणाले "आमचे आमदार संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराला भाजपने पक्ष सोडण्याच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. संजय सिंह यांच्यासोबत सोमनाथ भारतीही पत्रकार परिषदेत होते. ते म्हणाले की, भाजपच्या लोकांनी मला सांगितले की 'आप'चे आणखी 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने छापा टाकला होता.त्यांची १४ तास चौकशी सुरु होती. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यावेळी सिसोदिया यांनी स्पष्ट केले होते की, भाजपने त्यांना 'आप' सोडण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती.

"भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्यासाठी आम आदमी पार्टी खोटेपणाचे वातावरण तयार करत आहे. मनीष सिसोदिया यांना उत्तर द्यावे लागेल," असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काल (बुधवारी) सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com