Assembly Session : राहुल गांधींच्या मुद्यावर विरोधक आक्रमक : विधानसभा अध्यक्ष कारवाईचा निर्णय घेत नसल्याने सभात्याग

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे सदस्य काळ्याफिती लावून आले हेाते.
Assembly Session
Assembly SessionSarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या आवारात खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न झाला. त्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज विरोधक विधानसभेत सकाळीच प्रचंड आक्रमक झाले. त्यानंतरही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय जाहीर न केल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील यांनी आक्रमक होत सभात्याग केला. (Opponents walk out of Assembly over Rahul Gandhi's issue)

दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे सदस्य काळ्याफिती लावून आले हेाते. ते सभागृहाच्या आचारसंहितेत येत नाही. तुम्ही सभागृहाच्या पायऱ्यावर बसून तुम्ही निषेध करू शकता. पण, आता त्या काळ्याफिती काढून टाकाव्यात, असे निर्देश नार्वेकर यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिले.

Assembly Session
Congress News : कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२४ जाणांची पहिली यादी जाहीर : सिद्धरमय्यांना कोलारमधून अखेर डावललेच

विधीमंडळाच्या आवारात खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न झाला. त्या सदस्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसचे सदस्य आज सकाळीच विधानसभेत आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुद्दा लावून धरला. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी कारवाईचा निर्णय आजच जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली. मात्र, विधीमंडळाच्या आवारातील आचारसंहितेचा प्रश्न असल्याने दोन्ही सभागृहातील पीठासीन अधिकाऱ्यांना विश्वासत घेऊनच हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Assembly Session
Harshvardhan Jadhav : उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड भावुक झालो; पण निरोप आला, ‘नॉट इंटरेस्टेड...’ : हर्षवर्धन जाधवांनी सांगितली आतली गोष्ट

सभागृहाबाहेरील झालेल्या घटनेप्रकरणी आतापर्यंत निर्णय व्हायला पाहिजे होता. त्यासाठी सभागृह स्थगित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत त्याच्या निषेधार्थ आम्ही विरोधी पक्ष सभात्याग करीत आहेत, अशी घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com