'अरे छट हा तर निघाला... आणखी एक टोमणे बॉम्ब!'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडताना तेथे होतो, या दाव्याची ठाकरे यांनी खिल्ली उडवली. बाबरी पाडली तेव्हा मी, होतो असे देवेंद्रजी म्हणाले. ती तुमच्या काय शाळेची सहल होती काय? तुमचे वय काय तुम्ही बोलता किती. तुम्ही खरच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती, असे ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. (Devendra Fadnavis Latest News)

देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले, सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट हा तर निघाला... आणखी एक टोमणे बॉम्ब...जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा! अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. त्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले "शिवजीपार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट, हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे. आणि हिंदुजननायक मा. राजसाहेब ठाकरे. बाकी सगळे....जय हिंद, जय महाराष्ट्र.''

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही टिका केली आहे. ते म्हणाले, होय, @CMOMaharashtra होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, भ्रष्टाचाऱ्यांपासून...होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, वसुलीजीवी लोकांपासून...होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, मुंबईकरांच रक्त पिणाऱ्या बांडगुळांपासून...

भाजप आमदार उतुल भातखळकर म्हणाले, उध्दवजींची मोठा जोक, म्हणे शिवसैनिकाशी फोनवर बोललो...हे राज्याच्या कॅबिनेटत्र्यांशी फोनवर बोलत नाहीत...असा टोला भातखळकर यांनी लगावाल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com