ठाकरेंना पालघरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी धक्का; जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

Palghar : पालघर जिल्ह्यातून शिंदे गटात दोन दिवसांपासून जोरात इनकमिंग सुरू झाले आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

पालघर : पालघर जिल्ह्यातून शिंदे गटात दोन दिवसांपासून जोरात इनकमिंग सुरू झाले आहे. लागोपाठ दोन दिवस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटास धक्के दिल्यावर आज (ता. २६ सप्टेंबर) तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण आणि त्यांच्याबरोबर तीन जिल्हा परिषद सदस्य व एका पंचायत समिती सदस्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पालघरमध्ये शिवसेनेला (Shivsena) मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Palghar Zilla Parishad President Vaidehi wadhan's join Shinde group)

Uddhav Thackeray, Eknath Shinde
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी शनिवारी (ता. २४ सप्टेंबर) शिंदे गटात प्रवेश केला होत. कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष व उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी रविवारी (ता. २५ सप्टेंबर) प्रवेश केला आहे. त्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य गणेश उंबरसडा, नीता समीर पाटील, मंगेश भोईर व डहाणू पंचायत समिती सदस्य सविता धेंडे यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

पालघर जिल्ह्यात ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून सर्वच पक्ष ही निवडणूक लढवत आहेत. १३ ऑक्टोबरला निवडणूक घोषित झाली असून उद्या २७ सप्टेंबरला अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. २८ तारखेला अर्जाची छाननी होणार असून २९ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. हे इनकमिंग असेच सुरू राहिल्यास पालघर जिल्ह्यात शिवसेनेला फार मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
मुनगंटीवारांनी सांगितले, गुजरातचा सिंह महाराष्ट्रात, महाराष्ट्राचा वाघ जाणार गुजरातमध्ये!

आम्ही शिवसैनिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा

ग्रामपंचायत निवडणुकीत रात्रीपर्यंत अर्ज भरण्यासाठी आमच्याबरोबर असलेल्या पदाधिकाऱ्यांवर काय विश्वास ठेवायचा, असा सवाल सर्वसामान्य शिवसैनिक उपस्थित करत आहेत. काल आमच्याबरोबर आज लगेच दुसरीकडे अशी काय जादूची कांडी फिरवली की सर्व जण मूळ शिवसेनेला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत, असा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करीत आहेत. आम्ही कार्यकर्त्यांनी करायचे काय, कोणाला भेटायचे, असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिक उपस्थित करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com