Phone tapping case रश्मी शुक्लांना अटकेपासून दिलासा पण...

phone tapping case : फोन टॅपिंग केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांनी ५ मार्चला गुन्हा दाखल केला होता
phone tapping case - Rashmi Shukla
phone tapping case - Rashmi Shukla

मुंबई : फोन टॅिपग प्रकरणी (Phone tapping case) वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. १ एप्रिलपर्यंत रश्मी शुक्लांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कुलाबा पोलिसांना दिले. तसेच येत्या १६ व २३ मार्चला सकाळी ११ ते दुपारच्या वेळेत जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Phone tapping case latest news)

दोन वर्षापूर्वी सत्तास्थापनेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी रश्मी शुक्लांविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईतील कुलाबा पोलिसांनी ५ मार्चला गुन्हा दाखल केला. परंतु आपल्याविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा खोटा आणि राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा दावा रश्मी शुक्ला यांनी केला होता. तसेच या प्रकरणी होणाऱ्याअटकेपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. ज्यात त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.

phone tapping case - Rashmi Shukla
राजकारण तापलं : पवार हे मुख्यमंत्र्यांचा तर फडणवीस राज्यापालांच्या भेटीला

न्यायमूर्ती श्रीराम मोडक आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी शुक्ला यांची याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने शुक्ला यांच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर १ एप्रिलपर्यंत शुक्ला यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले. पण, शुक्ला यांनी १६ व २३ मार्चला चौकशीसाठी पोलिसांसमोर जबाबासाठी हजर राहण्याचेही आदेश दिले.

यावेळी रश्मी शुक्ला म्हणाल्या की, संजय पांडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याविरोधात गुन्हा दाखल केला आला. संजय पांडे यांनी आपल्यावर दाखल केलेला गुन्हा पूर्वीच्या अहवालावर आधारित आहे. पांडे यांचा अहवाल चुकीचा आणि निराधार असून आपण केलेल्या फोन टॅपिंगमुळे पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांमधील भ्रष्टाचार उघडकीस आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com