Modi in Mumbai : VIDEO मोदी मुंबईत; काँग्रेस नेत्याच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा

PM Narendra Modi on Mumbai Visit Today :मोदींचा निषेध करण्यात येणार असल्याने गायकवाड यांच्या घराबाहेर अन् परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
PM Narendra Modi on Mumbai Visit Today Varsha Gaikwad
PM Narendra Modi on Mumbai Visit Today Varsha GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Varsha Gaikwad On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांचे मुंबई आणि पालघरमध्ये कार्यक्रम आहेत. मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भुमिपूजन होणार आहे. मोदींचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा दिसत आहे. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोदींचा निषेध करण्यात येणार असल्याने गायकवाड यांच्या घराबाहेर अन् परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

PM Narendra Modi on Mumbai Visit Today Varsha Gaikwad
Prashant Paricharak: प्रशांत परिचारकांना मोठा धक्का; कट्टर समर्थक 'तुतारी'फुंकणार

मोदींचा निषेध करण्यासाठी निघालेल्या वर्षाताईंना पोलिसांना रोखलं आहे. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा आहे तो कोसळला आहे.

आम्ही बीकेसीला जाऊन पंतप्रधानांना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारु की अशातऱ्हेने निकृष्ठ दर्जाचे काम झालेलं आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही? आणि ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही? असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

PM Narendra Modi on Mumbai Visit Today Varsha Gaikwad
Porsche Car Accident: 'कार'नामा करणाऱ्या बाळाला भूर्र उडून जायचंय?

पंतप्रधान यांना काळे झेंडे दाखवून वर्षा गायकवाड आंदोलन करणार आहेत. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वर्षा गायकवाड यांना ही घराबाहेर पडू न देण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना पोलिसांनी अटक केली. तर काँग्रेस नेते नसीम खान यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

केंद्र सरकारचा महत्त्वाकांशी असलेल्या वाढवण प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते आज भूमीपूजन होत आहे. जगातील 10 मोठ्या बंदरापैकी वाढवण हे एक बंदर असणार आहे. हजारो कोटींचा हा प्रकल्प भारतासाठी गेमचेंजर ठरणार आहे. 76 हजार 200 कोटी रुपयांचा निधी बंदराच्या उभारणीसाठी देण्यात आला आहे.

एकीकडे भूमीपूजन सोहळ्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे बंदर विरोधातील बॅनरबाजी करण्यात येत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी काळे झेंडे लावत भूमीपूजन कार्यक्रमाचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसायाचे नुकसान होईल, असे मच्छिमारी करणाऱ्या काही व्यावसायिकांचे मत आहे. त्यांनी मोदींच्या निषेध करण्यासाठी बोटींवर काळे फुगे लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com